आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद जिव्हाळ्याचा:कुठलेच सरकार शेतकऱ्याला हमीभाव देऊ शकत नाही : पालकमंत्री बच्चू कडू; सह्याद्री फाउंडेशन सांस्कृतिक भवन निर्मिती साहाय्य कृतज्ञता सोहळा

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अजूनही महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन व्यतीत करतो आहे. शेतकरी आत्महत्या थांबायचे नाव नाही. यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची आवश्यकता आहे. कर्ममाफी दोन्ही सरकारकडून देण्यात आली. कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांची होणारी लूट दुप्पट असते. सोयाबीनचे भाव ८ हजारावर गेले. सोयाबीन, तूर आयातीनंतर ते पुन्हा भाव पडले. त्यामुळे कुठलेच सरकार शेतकऱ्याला हमीभाव देऊ शकत नाही. पण शेतीचा खर्च कमी करू शकते. यावर काम होण्याची आवश्यकता आहे,’ असे उद्गार पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले. सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने सोमवार, ४ एप्रिलला सायंकाळी सांस्कृतिक भवन रामदासपेठ येथे ‘नाट्यगृह निर्मिती कृतज्ञता सोहळा’ आयोजित करण्यात आला हाेता. या सोहळ्यात चित्रपट दिग्दर्शक व लेखक प्रा. नीलेश जळमकर यांनी ‘मी बच्चू कडू बोलतो’ संवाद जिव्हाळ्याचा! या शीर्षकाखाली पालकमंत्री बच्चू कडू यांची प्रकट मुलाखत घेतली. यात बच्चू कडू यांचा राजकीय प्रवास, त्यांची बंडखोर आंदोलन, दिव्यांग, विधवा महिला व शेतकरी समस्या विविध विषयांवर त्यांना प्रश्न विचारण्यात आले.

सत्ताधारी पक्षात असताना शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या कामावर आपण समाधानी आहात का? या प्रश्नाचे उत्तर देताना बच्चू कडू म्हणाले, सत्ता पक्षाकडून अजून शेतकऱ्यांसाठी पाहिजे तसे काम झाले नाही. कोरोनामुळे अनेक कामे मागे पडली. पण पुढल्या काळात त्याला गती मिळेल. आपल्याकडे नेहमी वस्तूचे भाव वाढल्यास ग्राहक ओरडा करतात. उत्पादक शेतकरी कायम तोट्यात असतो. शेतकऱ्यांचा विचार सधन लोकांमध्ये होत नाही. ही खंत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखणे आपल्यापुढे आवाहन असल्याचे ते म्हणाले.

प्रहारच्या अनोख्या आंदोलनाचे सहस्य उलगडताना ते म्हणतात, मला वेगळ्या आंदोलनाची प्रेरणा चित्रपटातून मिळते. आंदोलन म्हणजे मोर्चा, उपोषण अशीच कल्पना आहे. पण त्याला फाटा देण्याचा प्रयत्न केला. जसे शोले चित्रपटापासून शेतकऱ्यांसाठी टाकीवर चढून आंदोलन करण्याची प्रेरणा मिळाली, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...