आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • No Response To Tenders For Daily Market Collection, Akola Municipal Corporation Invites Tenders For The Second Time, Deadline Till November 4

दैनंदिन बाजार वसुलीच्या निविदांना प्रतिसाद नाही:अकोला महापालिकेने दुसऱ्यांदा बोलावल्या निविदा, 4 नोव्हेंबरपर्यंत मुदत

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने दैनंदिन बाजार वसुलीसाठी बोलावलेल्या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेने आता दुसऱ्यांदा ऑनलाईन निविदा प्रसिद्ध केल्या असून 4 नोव्हेंबरपर्यंत निविदा दाखल करता येणार आहेत. दरम्यान बाजार वसुली करणाऱ्या विद्यमान कंत्राटदाराला दोन महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

महापालिकेला मालमत्ता कर, पाणीपट्टी, विकास शुल्का नंतर परवाना तसेच दैनंदिन बाजार वसुली उत्पन्नाचे महत्वाचे साधन आहे. महापालिका क्षेत्रात महसुल विभागाच्या जागेत कच्च्या स्वरुपात बांधलेली दुकाने तसेच मुख्य मार्गालगत चारचाकी गाडी लावून अथवा खाली बसुन व्यवसाय करणाऱ्यांकडुन दैनंदिन बाजार वसुली केली जाते. दैनंदिन वसुलीचे काम पूर्वी महापालिकेचे कर्मचारी करीत होते. मात्र बाजार विभागातील कर्मचारी सेवा निवृत्त होत गेल्याने त्यांची संख्या कमी झाली. तसेच महापालिकेची हद्दवाढ झाली.

परिणामी महापालिकेने दैनंदिन बाजार वसुलीचे काम कंत्राटदारा मार्फत सुरु केले. विद्यमान कंत्राटदाराचा कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी महापालिकेने दैनंदिन बाजार वसुलीसाठी निविदा प्रक्रिया राबवली. मात्र या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. मागील वर्षीचा एका वर्षाचा ठेका 94 लाख रुपयांना देण्यात आला होता. विद्यमान कंत्राटदारानेही निविदा दाखल केली नाही. त्यामुळे बाजार विभागाने दुसऱ्यांना निविदा बोलावल्या आहेत.

चार नोव्हेंबर पर्यंत निविदा दाखल करता येणार आहेत. महापालिका प्रशासनाने 15 टक्के वाढ करुन एक कोटी 7 लाख रुपयाच्या निविदा बोलावल्या. मात्र या रकमेमुळे अद्याप कोणत्याही कंत्राटदाराने निविदा दाखल केली नाही. ही बाब लक्षात घेवून पुढील व्यवस्था होई पर्यंत महापालिका प्रशासनाने विद्यमान कंत्राटदाराला दोन महिन्याची मुदतवाढ दिली आहे. पुढील व्यवस्था होई पर्यंत दैनंदिन बाजार वसुलीचे काम विद्यमान कंत्राटदाराकडेच राहणार आहे.

जाहिरात होर्डिग्जच्या निविदांनाही प्रतिसाद नाही

महापालिकेने दैनंदिन वसुली सोबतच जाहिरात होर्डिग्जसाठीही निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. शहरात 100 ठिकाणी जाहिरात फलक आहे. यातूनही महापालिकेला महसुल मिळतो. मात्र या निविदांनाही अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जाहिरात होर्डिग्जच्या निविदाही पुन्हा प्रसिद्ध कराव्या लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातम्या आणखी आहेत...