आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे गाडीचे उद्घाटन:रेल्वेसेवेमुळे उत्तरेकडील राज्ये जोडली जाणार ; देवेंद्र फडणवीस

अकोला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अकोला रेल्वेस्थानक हे दक्षिण व उत्तरेकडील राज्यांना जोडणारे महत्वाचे स्थानक आहे. अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे उत्तरेकडील राज्ये अकोल्याशी जोडण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल असून, येत्या काळात देशात हा जिल्हा दळणवळणाचे महत्वाचे केंद्र ठरेल,’ असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

दरम्यान येत्या काळात अकोल्यासह विदर्भ आणि मराठवाडयातील रेल्वे प्रकल्प मार्गी लागून दळण-वळणाची साधणे सक्षम करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या वेळी केले. अकोला-अकोट पॅसेंजर गाडी क्र.०७७१८ चा शुभारंभ दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. ६ वरून बुधवारी झाला. या वेळी रिमोट व्हिडिओ लिंकद्वारे केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गाडीचे रोजचे वेळापत्रक
सकाळी ७ वा. अकोल्यावरून निघेल, अकोटला ८.२० वा. पोहाेचेल
सकाळी ९ वा. अकोटहून निघून १०.२० वा. अकोल्याला पोहाेचेल
सायंकाळी ६ वा. अकोल्यावरून निघून ते अकोटला रात्री ७.२० वा. पोहाेचेल
रात्री ८ वा. अकोटहून निघून रात्री ९.२० वा. अकोला येथे पोहाेचेल

बातम्या आणखी आहेत...