आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह:आत्महत्या नव्हे; मुलानेच पित्याची हत्या करून मृतदेह जाळला

बोरगाव मंजू4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोटच्या मुलाने ६१ वर्षीय पित्याची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. त्यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजता उघडकीस आली. या घटनेत सुनेचाही सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी मुलगा आणि सून दोघांनाही अटक केली. त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोरेगाव पुंडलिक महाराज येथील मारोती गेंदाजी चोपडे वय ६१ यांना दारूचे व्यसन होते. दारू पिऊन ते मुलगा व सुनेला त्रास देत होते. मुलगा विनोद मारोती चोपडे व त्याची पत्नी यांनी संगनमत करून गुरुवारी रात्री वडील मारोती चोपडे यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. गंभीर जखमी झालेले मारुती चोपडे यांचा या घटनेत मृत्यू झाला. दरम्यान घटनेनंतर विनोद याने आपल्याच बापाला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष राऊत, ठाणेदार सुनील सोळंके यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूर्तिजापूर येथील रुग्णालयात दाखल केला. मुलगाच वडिलांवर संशय घ्यायचा त्यातून हत्याकांड घडल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. ठाणेदार सुनील सोळंके यांनी विनोद मारोती चोपडेसह त्याची पत्नी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली आत्महत्या नव्हे: मुलानेच पित्याची हत्या करून मृतदेह जाळला .................... असता त्यांनीच हत्या केल्याचे प्रथमदर्शनी तपासात समोर आल्याने हेकॉ. प्रदीप इरतकर यांच्या फिर्यादीवरून पतीपत्नीविरुद्ध खुनाचा व पुरावा नष्ट केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

मुलगा म्हणाला बापानेच जाळून घेतले, पोलिस म्हणाले घरात रक्ताचे डाग कसे?
वडिलानेच जाळून घेतले असा बनाव मुलाने रचला. बोरगाव मंजू पोलिस घटनास्थळी पोहाेचले. त्यांनी घटनेचा पंचनामा सुरू केला असता त्यांना संशयास्पद वाटले. म्हणून त्यांनी सखोल तपास सुरू केला असता घरात रक्तमिश्रित पाणी दिसून आले, तर काही ठिकाणी रक्ताचे डागही दिसून आले. मारोती चोपडे यांनी जाळून घेऊन आत्महत्या केली असेल तर रक्त कसे, म्हणून पोलिसांनी मुलगा विनोद व त्याची पत्नी यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आत्महत्या नव्हे तर वडिलांच्या त्रासाला कंटाळून आधी मारले आणि ओढत ओढत घराबाहेर आणून त्यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस तपासात समोर आले. बोरगाव मंजू पोलिसांनी काही तासातच हत्येचा उलगडा केला. आरोपींना दोन मुले आहेत.

बातम्या आणखी आहेत...