आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:परिचारिकांचे पालकमंत्र्यांना प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन ; पालकमंत्री बच्चू यांना सादर

अकोला16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रलंबित मागण्या कालबद्ध पद्धतीने पूर्ण होत नसल्याने जिल्हा परिषद नर्सेस संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास २० जूनपासून आंदोलन छेडण्यात येणार आहे. हे आंदोलन तीव्र झाल्यास त्याचा परिणाम रुग्णसेवर होण्याची शक्यात आहे. यापूर्वी संघटनेने आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांची भेट घेतली होती. मात्र त्यानंतरही तोडगा न निघाल्याने आता पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डाटा एंट्री ऑपरेटर नेमण्यात यावेत, आरोग्य सेविकेच्या नावाने आलेले उपकेंद्रस्तरावरील अनमोल टॅब परत करण्याबाबत मागणी पूर्ण करावी, यासह अन्य मागण्यांबाबत नर्सेस संघटनेने २७ ऑक्टोबर रोजी कामबंदचे हत्यार उपसले हाेते. प्रशासनाने मागण्यांबाबत आश्वासन दिले. मात्र आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप संघटनेने केला. आंदोनलाला आठ महनिे उलटल्यानंतरही मागण्या मंजूर झाल्या नाहीत. त्यामुळे याबाबत तोडगा काढावा; अन्यथा येणाऱ्या दिवसांत संघटना आक्रमक होऊन आंदोलन करेल, असा इशारा नर्सेस संघटनांनी पालकमंत्री बच्चू यांना सादर केलेल्या निवेदनात दिला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा संगीता जाधव, सल्लागार समितीच्या वजियकर, दुर्गा पवार, खवले, सुनीता वानखडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होत्या. काय म्हणतात परिचारिका? ः १) नर्सेस गत दहा वर्षांपासून पदोन्नतीची प्रक्रिया रखडली आहेत. आरोग्य सेविका सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेल्या असतानाही त्यांना सेवेत कायम प्रस्ताव झालेले नाहीत. २) प्रथम नियुक्ती तारखेपासून आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. ३) संपूर्ण प्रकारच्या डाटा एन्ट्रीचे काम आरोग्यसेविकांना दिले आहे. ४) आरोग्यसेविका डाटा एंट्री ऑपरेटर नसून, संपूर्ण प्रकारच्या डाटा एंट्री काढण्यात यावेत. ५) आरोग्य वर्धनी उपकेंद्रअंतर्गत १५०० रुपये मानधन आरोग्य सेविकेला अद्यापही मिळालेले नाही. विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद नर्सेस संघटनेने पालकमंत्री बच्चू कडू यांना निवेदन सादर केले.

बातम्या आणखी आहेत...