आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:प्रभाग आरक्षणावर हरकती; सूचना  दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

अकोला9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली. दरम्यान १ ऑगस्टला एकही हरकत व सूचना दाखल झाली नाही. तर २ ऑगस्टला दुपारी तीन वाजेपर्यंत हरकती - सूचना दाखल करता येणार आहेत. त्यानंतर आलेल्या सूचना व हरकतींचाविचार केला जाणार नाही. दरम्यान ५ ऑगस्टला अंतिम प्रभाग आरक्षण जाहिर केले जाणार आहे.

या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार इतर मागासवर्गीयांना महापालिका निवडणुकीत आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्या नंतर निवडणूक आयोगाने यापूर्वी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी जाहिर केलेले आरक्षण रद्द करुन इतर मागासवर्गीयासाठी २९ जुलै रोजी येथील प्रमिलाताई ओक सभागृहात आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

यात ९१ पैकी २४ जागा इतर मागासवर्गीयांच्या जागा आरक्षित करण्यात आल्या. यापैकी १२ जागा इतर मागासवर्गीय (महिला)साठी आरक्षित करण्यात आल्या. ३० जुलै रोजी प्रभाग आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात आले. तर मंगळवार २ ऑगस्ट पर्यंत दुपारी तीन वाजे पर्यंत हरकती आणि सूचना महापालिका कार्यालयातील निवडणूक विभागात लेखी स्वरुपात दाखल करुन घेतल्या जाणार आहे.

ज्या नागरिकांना आरक्षणावर हरकत घ्यावयाची आहे तसेच काही सूचना द्यावयाच्या आहेत. त्यांनी २ ऑगस्ट दुपारी तीन वाजे पर्यंत लेखी स्वरुपात सादर कराव्यात, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांची दखल घेवून ५ ऑगस्टला अंतिम प्रभाग आरक्षण जाहिर केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...