आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 ऑगस्टला प्रभागाचे अंतिम आरक्षण जाहीर होणार:प्रभाग आरक्षणावर मंगळवारपर्यंत दाखल करता येणार हरकती-सूचना

अकोला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली. 1 ऑगस्ट रोजी एकही हरकत व सुचना दाखल झाली नाही, तर 2 ऑगस्टला दुपारी तीन वाजेपर्यंत हरकती - सुचना दाखल करता येणार आहेत. त्यानंतर आलेल्या सुचना व हरकतींचा विचार केला जाणार नाही. दरम्यान 5 ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग आरक्षण जाहिर केले जाणार आहे.

इतर मागासवर्गीयांना महापालिका निवडणुकीत आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवडणुक आयोगाने यापूर्वी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी जाहिर केलेले आरक्षण रद्द करुन इतर मागासवर्गीयासाठी 29 जुलै रोजी येथील प्रमिलाताई ओक सभागृहात आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

यात 91 पैकी 24 जागा इतर मागासवर्गीयांच्या जागा आरक्षित करण्यात आल्या. यापैकी 12 जागा इतर मागासवर्गीय (महिला)साठी आरक्षित करण्यात आल्या. 30 जुलै रोजी प्रभाग आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात आले. तर 2 ऑगस्टपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत हरकती व सुचना महापालिका कार्यालयातील निवडणुक विभागात लेखी स्वरुपात दाखल करुन घेतल्या जाणार आहे.

ज्या नागरिकांना आरक्षणावर हरकत घ्यावयाची आहे तसेच काही सुचना द्यावयाच्या आहेत. त्यांनी 2 ऑगस्ट दुपारी तीन वाजे पर्यंत लेखी स्वरुपात सादर कराव्यात, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांची दखल घेऊन 5 ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग आरक्षण जाहिर केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...