आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरांचा मुक्तसंचार वाढला:मोकाट जनावरांचा रहदारीला अडथळा ; बेताल वाहतुकीचा सर्वांनाच त्रास

अकाेला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहातील मुख्य चाैक, रस्त्यांवर माेकाट जनावरांचा मुक्तसंचार वाढला असून, त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण हाेत असल्याचे रविवारी ४ सप्टेंबरला िदसून आले. आधीच अकाेल्यात काही बेशिस्त चालकांमुळे वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. बेताल वाहतुकीचा सर्वांनाच त्रास हाेताे. अशातच शहरातील मुख्य रस्त्यांवर माेकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा िनर्माण हेत आहे. दरम्यान रविवारी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाकडून अशाेक वाटिकेकडे जाणारा मार्ग आणि सिव्हील लाईन्स चाैकाकडे जाणाऱ्या राेडवर जनावरांनी अनेक ठिकाणी ठाण मांडला हाेता. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण हाेत असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी स्वत: हातात काठी घेऊन रस्त्यावर ठाण मांडलेल्या जनावरांना हाकलावे लागले.

बातम्या आणखी आहेत...