आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वान प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले:नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, काटेपूर्णा प्रकल्पातून 22 तासांत 28.64 दलघमीचा विसर्ग

प्रतिनिधी । अकोला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पातून आज सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मागील २२ तास ३० मिनिटांत २८.६४ दशलक्ष घनमिटर पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. तर, वान प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

काटेपूर्णा प्रकल्पाची साठवण क्षमता ८६.३५ दलघमी आहे. यापूर्वी ३१ जुलैरोजी काटेपूर्णा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले होते. ते १ ऑगस्टरोजी बंद करण्यात आले. त्यानंतर मागील दोन दिवसांत वाशीम, मेडशी, मालेगाव या भागात जोरदार पाऊस झाल्याने प्रकल्पात पाण्याची आवक वाढली.

नियमानुसार १ ते १५ ऑगस्टदरम्यान ८५ टक्के जलसाठा ठेवता येतो. मात्र, प्रकल्पात वाढ झाल्याने अखेर ४ ऑगस्ट रोजी सांयकाळी सात वाजता प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर पाऊस आणि पाण्याचा फ्लो अधिक प्रमाणात सुरुच राहिल्याने टप्प्या-टप्प्याने दरवाजे उघडण्यात आले. ४ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता प्रकल्पाचे दहाही दरवाजे उघडण्यात आले. तर पाण्याची आवक कमी झाल्याने ५ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता १० पैकी चार दरवाजे बंद करुन सहा दरवाज्यातून विसर्ग सुरु ठेवण्यात आला. तुर्तास प्रकल्पातून विसर्ग सुरु असून पाण्याची आवक तसेच येणारा पाऊस लक्षात घेवून काटेपूर्णा प्रकल्पाचे दरवाजे उघडणे आणि बंद करणे याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी दिली.

दरम्यान, जिल्ह्यातील दुसऱ्या मोठ्या वान प्रकल्पाचे दोन दरवाजे आज सायंकाळी पाच वाजता ३० सेंटीमिटरने उघडण्यात आले असून यातून २८.८६ घनमिटर प्रतिसेंकद पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

असा झाला काटेपूर्णातून विसर्ग

४ ऑगस्टरोजी

- सांय ७ ते ७.४५ वाजता - २४ कोटी ९० लाख लिटर(चार गेट)

- रात्री ७.४५ ते ९.३० - १४५ कोटी २७ लाख लिटर

- रात्री ९.३० ते पहाटे ४.३० - १३१७ कोटी ६५ लाख लिटर (१० गेट)

५ ऑगस्टरोजी

पहाटे ४.३० ते ७.३० वाजता - ५४७ कोटी ५६ लाख लिटर

- सकाळी ७.३० ते ८.३० - १८१ कोटी २१ लाख लिटर

- सकाळी ८.३० ते दु.२.३० - ४९८ कोटी ९ लाख लिटर

- दु.२.३० ते ५.३० - १४९ कोटी ४१ लाख लिटर (सहा गेट)

बातम्या आणखी आहेत...