आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:नवजात अर्भक बेवारस सोडणाऱ्याविरूद्ध गुन्हा

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोटफैल पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाचमोरी (कानडी) शेतशिवारात एक मानव जातीचे नवजात अर्भक आढळूल आले. बेवारसपणे नवजात अर्भक सोडणाऱ्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पाचमोरी येथील पोलिस पाटील यांना त्यांच्या शेतात कामावर असलेल्या मजुरांनी माहिती दिली की, त्यांच्या शेताच्या लगत असलेल्या नाल्यामध्ये एक नवजात अर्भक कापडामध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आहे. त्यावरून त्यांनी शेतात जावून पाहिले असता मृतावस्थेत त्यांना अर्भक दिसून आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपीविरूद्ध भादंविचे कलम ३१८ नुसार गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...