आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिक्षक दिनी आदर्श शिक्षकांचा सत्कार

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त शिक्षक नामदेवराव फाले यांचा शिक्षक दिनानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे गाैरव करण्यात आला. महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार व विभागीय अध्यक्ष कृष्णा अंधारे यांचे हस्ते त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील नाकट, योगेश थोरात, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद नाकट, सरचिटणीस शंतनू वसू, घनश्याम दांदळे, अरुण गवई, रघुनाथ अंधारे, ज्ञानेश्वर गावंडे, प्रदीप लुगडे, दिपक गावंडे, पवन ढोले आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...