आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजाच्या व्यथा आपल्या समजून सुंदर सामाजिक जग निर्माण करणाऱ्या व्यक्ती व संस्थाचा सन्मान श्री संकल्प मित्र परिवाराच्या वतीने अकोला शहरात सत्कर करण्यात आला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश पाचकवडे हाेते तर प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य उपसंचालक तरंगतुषार वारे, भरत शाह यांची उपस्थिती होती. या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार वर्षंभर विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक दायित्व पूर्ण करणारा संकल्प मित्रपरिवार सात वर्षांपासून सेवाव्रत जोपासत आहे.
त्यासोबतच समाजातील विविध क्षेत्रात प्रामाणिक कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान करीत असते. या वर्षी समाजसेवक मनीष हिवराळे, वृक्षमित्र शनमुगा नाथन, वन्यजीव व पर्यावरण सेवक यादव तरटे, रक्तदानाचे कार्य करणारे श्री छत्रपती प्रतिष्ठान, प्राण्यांची सेवा करणारा एम. पी. सी. ए. ग्रुप अकोला यांना सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक अश्विनी नारे, संचालन विजेंद्र वरोकार, आभार प्रदर्शन रुपाली धोत्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता अमोल पाचकवडे, मनीष गावंडे, मनीष कलोरे, वीरेंद्र सपकाळ, शशांक धुळे, शुभम पाचकवडे, यश आसरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पक्षी पाणी पात्र भेट : कार्यक्रमाला उपस्थित सर्व निमंत्रितांना उन्हाळ्यात पक्ष्यांच्या पाणी पिण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन करून संकल्प प्रतिष्ठान कडून मातीचे पक्षी पाणी पात्र भेट देण्यात आले. अकोला हे अती तप्त शहर म्हणून जगात ओळखले जाते. ही ओळख मोडीत काढण्यासाठी वृक्षमित्र नाथन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पावसाळ्यात ११ हजार वृक्षारोपण करण्याचा निर्धार संकल्प प्रतिष्ठानने केला, अशी माहिती श्री संकल्प मित्र परिवाराच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.