आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राेष व्यक्त:शिक्षक दिनी शिक्षकांनी मागण्यांचा वाचला पाढा ; शिक्षक दिन निषेध दिन म्हणून साजरा

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक व विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेने साेमवारी शिक्षक दिन हा निषेध दिन म्हणून साजरा केला. शिक्षकांनी काळ्या फिती लावून आपला राेष व्यक्त करणार आहेत. याबाबत संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांतर्फे शिक्षण मंत्र्यांना निवेदनही पाठवले. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना सादर करण्यात आले.

खासगी शिक्षकांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. या मागण्यासाठी राज्य खासगी शिक्षक संघटनेने लाेकप्रनिधी, शासन, प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला. पाठपुरावा केला. अनेकदा बैठकाही झाल्या. मात्र सर्व प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना ५ सप्टेंबरला जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन पाठवले. शासन शिक्षकांच्या समस्यांबाबत दुर्लक्ष करत असल्याने ५ सप्टेंबर (शिक्षक दिन) या दिवशी आम्ही शिक्षक “निषेध दिन’ म्हणून साजरा केला, असेही संघटनेने स्पष्ट केले. निवेदन राज्याध्यक्ष मनीष गावंडे, अल्केश खेंडकर, अविनाश मते, नरेंद्र चिमणकर, कैलास सुरडकर, जिल्हाध्यक्ष वसीम मुजाहिद, अमोल वानखडे, संतोष गावंडे, दत्ता घोंगे, महिला आघाडी अध्यक्ष सुवर्णा वरोकार, रजनी अरबाळ, जयसिंग मचले, राजन लोखंडे, योगेश राठोड, प्रशांत घुगे, डी.एस. वाहुरवाघ, सुदर्शन भिसे, गजानन सवडतकर, सय्यद आरिफ, फाईक आसिम, मो.शोएबुद्दीन, मोहम्मद मुजाहिद, मोहम्मद जाफर आदींनी सादर केले.

बातम्या आणखी आहेत...