आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती ते अकोलादरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर लोणी ते मूर्तिजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील, चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी बिटुमिनस काँक्रिटीकरणासह विक्रमी कामाला गुरुवारी सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी प्रारंभ झाला. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत ४ किलोमीटर १०० (४११० रनिंग मीटर, दोन लेनचा विचार केल्यास ८ हजार २२० मीटर) मीटरचे डांबरीकरण झाले असून हे काम आगामी ९७ तास अखंडितपणे सुरूच राहणार आहे. एकूण १०८ तासांत ४० किलोमीटर (दोन्ही लेन मिळून ७५ ते ८० किमी) डांबरीकरण पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
लोणी येथून राष्ट्रीय महामार्गाच्या विक्रमी कामाला सुरुवात
07 वाजून २७ मिनिटांनी काम सुरू 97 तास अखंडपणे काम सुरू राहणार 108 तासांत काम पूर्ण करण्याचा संकल्प
वर्षअखेरीस ९५ टक्के काम पूर्ण होणार
अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२२ पर्यंत ९५ टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन लेनची रुंदी ९ मीटर राहणार असून दोन्ही लेन मिळून विश्वविक्रमी रस्ता बांधकाम विक्रमी वेळेत पूर्ण केले जाईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य प्रवर्तक राजीव अग्रवाल यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.