आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार सोहळा:अहिल्यादेवींच्या पुण्यतिथीनिमित्त अकोल्यात उद्या सत्कार सोहळा

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धनगर समाज अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांच्या सत्कार समारंभाचे आयोजन १६ ऑगस्टला सकाळी ११ वाजता प्रमिलाताई ओक सभागृहात करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक केशवराव पातोंड राहतील.

उद्घाटक म्हणून माजी आमदार हरिदास भदे, वसतिगृह अधीक्षक सुरेखा पातोंड, प्रमुख वक्ते म्हणून डॉ. शांताराम बुटे, प्रा. श्रीकांत बरिंगे, प्रकाश पाचपोळ, पंकज सुलताने, बळीराम चिकटे, दिनकरराव नागे, काशीराम साबळे, गोपाल कोल्हे, माजी महापौर सुमन गावंडे, पुष्पा गुलवाडे, साहेबराव पातोंड, दीपक नागे, प्रमोद लहाळे, नारायणराव ढवळे गुरुजी, रामदास होपळ गुरुजी, डॉ. वसंतराव मुरळ, डॉ. सुरेश बचे, राजेश नवलकार, आदी उपस्थित राहतील. समाजबांधवांसह विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन धनगर समाज अधिकारी, कर्मचारी संघटनेचे दीपक नागे, यशवंत नागे, बाळासाहेब खराटे, कैलास बचे आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...