आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कार्यक्रमांचे आयोजन:गुरू- शिष्य समता पर्वानिमित्त‎ सिंदखेडराजात शोभायात्रा उत्साहात‎

सिंदखेडराजा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर यांच्या‎ जयंतीनिमित्त शहरात मंगळवारी, दि.‎ ११ एप्रिलपासून गुरू - शिष्य समता पर्व‎ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले‎ आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. १४‎ एप्रिलपर्यंत चालणार आहे.‎ या कार्यक्रमांतर्गत मंगळवारी‎ शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.‎ यासाठी नगर पालिका, सागर मेहेत्रे,‎ उमेश खरात यांच्यासह शिक्षक‎ संघटना, डॉक्टर, वकील संघटनेने‎ सहकार्य केले. शोभायात्रेच्या‎ समारोपप्रसंगी माजी आमदार तोताराम‎‎‎‎‎‎‎‎‎ कायंदे, डॉ. शशिकांत खेडेकर,‎ नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी‎ नगराध्यक्ष देविदास ठाकरे, अॅड. नाझेर‎ काझी, विजय तायडे, दिलीप खरात,‎ योगेश म्हस्के, श्याम मेहेत्रे, बाळू‎ शेवाळे, नीलेश ठाकरे, संदीप मेहेत्रे,‎ शहाजी चौधरी यांची उपस्थिती होती.‎ आज, दि. १२ एप्रिल रोजी‎‎‎‎‎‎‎‎‎ विद्यार्थ्यांसाठी प्रश्न मंजूषा,‎ मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडला. या‎ कार्यक्रमात गुरुवारी, दि. १२ रोजी‎ भानुसाद महाराज घुगे यांचे समाज‎ प्रबोधनात्मक कीर्तन होणार आहे.‎ शुक्रवारी, दि. १४ एप्रिल रोजी डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त‎ अभिवादन , मिरवणूक निघणार आहे.‎