आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावण सोमवार:श्रावण सोमवारनिमित्त आज प्रमुख मार्गावरील वाहतूक वळवली

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण सोमवारनिमित्त प्रमुख मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आली असून, चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. श्रावण महिन्यात जुने शहरातील राजेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीला गांधीग्राम येथील पूर्णा नदीतून पाणी आणून जलाभिषेक करण्याची जुनी परंपरा आहे. श्रावण महिन्यात रविवारी रात्री अकोला येथून शिवभक्त कावड, पालखी घेऊन गांधीग्राम येथे जातात व सोमवारी सकाळी पूर्णा नदीचे पाणी आणून राजेश्वर मंदिरातील पिंडीला जलाभिषेक करतात. त्यामुळे प्रत्येक वर्षी अकोट मार्गावरील गांधीग्रामपर्यंत भक्तांची गर्दी असते. ही बाब लक्षात घेता १५ ऑगस्टला दुपारी १२ वाजेपर्यंत अकोला-अकोट राज्य महामार्ग तसेच अकोला-दर्यापूर मार्गावरील वाहतूक व शहरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

असे आहे मार्ग बदल : १) अकोला बसस्थानक - साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चाैक (रेल्वे स्टेशन) - आपातापा चौक - गांधीग्राम मार्गे अकोटकडे जाणारी वाहतूक तसेच अकोट ते अकोलाकडे याच मार्गाने येणारी वाहतूक पर्यायी मार्ग म्हणून अकोला बसस्टँड - जेल चौक- निमवाडी खासगी बसस्टँड - वाशीम बायपास चौक- शेगाव टी पॉइंट- गायगाव -निंबा फाटा- अकोट. तसेच अकोटकडून अकोलाकडे येणारी वाहतूक याच मार्गाने वळवली आहे.

२) अकोला बसस्टँड -साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चाैक (रेल्वे स्टेशन) -आपातापा चौक- म्हैसांग- मार्गे दर्यापूरकडे तसेच दर्यापूर ते अकोलाकडे याच मार्गाने येणारी वाहतूक पर्यायी मार्ग म्हणून अकोला बसस्टँड-टॉवर चौक-रेल्वे स्टेशन-टिळक पार्क मार्गे सातव चौक-न्यू तापडिया नगर-खरप टी पॉइंट-म्हैसांग मार्गे दर्यापूर तसेच दर्यापूरकडून अकोल्याकडे येणारी वाहतूक याच मार्गाने वळवली आहे.

बातम्या आणखी आहेत...