आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • On The Occasion Of World Photography Day, A Camera Dindi Was Taken Out In The City; Celebrated With Various Competitions | Marathi News

कौटुंबिक मेळावा:जागतिक छायाचित्र दिनानिमित्त शहरात काढली कॅमेरा दिंडी ; विविध स्पर्धांनी साजरा

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्रकारांच्या प्रगतीसाठी कार्यरत असणाऱ्या अकोला-बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा केला. या दिनी शहरातील छायाचित्रकारांनी राजेश्वर मंदिरापासून कॅमेरा दिंडी काढली. या वेळी राजेश्वराला अभिषेक करत व डोक्याला लाल फेटे बांधून आकर्षक पालखीत कॅमेऱ्याला विराजमान करून दिंडी काढण्यात आली.

दिंडीचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते झाले. दिंडीतील वाहनात ज्येष्ठ छायाचित्रकार बाजीराव वझे, नारायण सैलानी व प्रदीप कुलकर्णी यांनी आकर्षक पोशाखात बसून सहभाग घेतला. तर दिंडीत एक व्हिडिओ कॅमेरा, एक फिल्म कॅमेरा व सन १९४० चा प्लेट कॅमेरा नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. ही अभिनव दिंडी राजेश्वर मंदिरापासून प्रारंभ होऊन जयहिंद चौक, मोठा पूल, सिटी कोतवाली, गांधी चौक, मनपा चौक मार्गे स्वराज्य भवन परिसरात येऊन या ठिकाणी या दिंडीचा समारोप करण्यात आला. दरम्यान या कॅमेरा दिंडीचे ठिक-ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. सिटी कोतवाली परिसरात भाजप पदाधिकाऱ्यांनी दिंडीचे स्वागत करत छायाचित्रकारांना शुभेच्छा दिल्या.

गांधी चौकात प्रा. डॉ. संतोष हुशे यांनी, तर परिसरात शरद कोकाटे यांनी स्वागत केले. भाटे क्लब परिसरात ही दिंडी येताच तेथे वझे फोटोग्राफर संस्थेच्या वतीने या दिंडीचे स्वागत करत सरबत वितरण करण्यात आले. दरम्यान रिधोरा रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये छायाचित्रकारांचा कौटुंबिक मेळावा संपन्न झाला. या वार्षिक आनंदोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून अन्नपूर्णा माता मंदिरचे विश्वस्त अन्नपूर्णेश पाटील उपस्थित होते. प्रास्तविक असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र नायसे यांनी केले. या वेळी रांगोळी, संगीत खुर्ची, दहीहंडी, कॅमेरा पूजन, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा व अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष नीरज भांगे, दिग्विजय देशमुख, सचिव नितीन देशमुख, सहसचिव राहुल गोटे, दत्तात्रय सरोदे, उमेश चाळसे, कोषाध्यक्ष योगेश उन्होने, सदस्य सुशील बडेरे, श्यामसुंदर बाळे, विशाल खंडारे, महेश इंगळे, हर्षल गढेकर, गौरव ढोरे, राहुल ताडे समवेत बहुसंख्य छायाचित्रकार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...