आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमपीएससी अर्थात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी पार पडली. ७ हजार ६२२ पैकी १ हजार ५१२ उमेदवारांनी परिक्षेलार दांडी मारली. अकोल्यातील २९ केंद्रांवर ६ हजार ११० उमेदवारांनी परीक्षा दिली. ही परीक्षा सकाळी ११ ते १२ या वेळेत झाली.
परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते. परीक्षा नियंत्रक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी तर विशेष निरीक्षक म्हणून जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी कामकाज पाहिले.
त्यांनी परीक्षा केंद्रांना भेटीही दिल्या. समन्वय अधिकारी म्हणून उपविगीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, विश्वनाथ घुगे, अनिल चिंचोले, संतोष येवलीकर, बळवंत अरखराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, सुनील पाटील, वि.अ. जवंजाळ यांनी कामकाज पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.