आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:पाण्याच्या टाकीला गळफास‎ घेऊन एकाची आत्महत्या‎

पातूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पातूरपासून तीन किमी. अंतरावरील देऊळगाव‎ एमआयडीसी परिसरातील पाण्याच्या टाकीला गळफास ‎घेऊन एका व्यक्तीने आत्महत्या‎ केल्याची घटना घडली आहे. या‎ घटनेची माहिती स्थानिकांनी पातूर‎ पोलिसांना दिली. पोलिसांनी‎ घटनास्थळी पोहाेचून पाहणी केली‎ असता तब्बल ६० फूट उंचीवर‎ व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.‎

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आत्महत्या केलेली‎ व्यक्ती प्राध्यापक असून अशोक दौलत गवई (वय अंदाजे‎ ५०) रा. साईनगर पातूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. या‎ वेळी मृतदेह खाली उतरवण्यासाठी पत्रकार दुले खान,‎ स्वप्निल सुरवाडे, प्रमोद कढोणे, किरण निमकंडे, रणजित‎ गाडेकर यांनी परिश्रम घेतले. पीएसआय गजानन पोटे,‎ पीएसआय मीरा सोनुने, मोहन भारस्कर, अभिजित‎ आसोलकर, छायाचित्रकार सतीश कांबळे, होमगार्ड‎ नितीन डोंगरे यांनी घटनास्थळी पोहाेचून पंचनामा केला.‎

बातम्या आणखी आहेत...