आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटिव्ह; दोघांना सुटी

अकोला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे आरटीपीसीआर ९१ अहवाल प्राप्त झाले. त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

तर दोन रुग्णांना डिस्चार्ज दिला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिली आहे. आरटीपीसीआर चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक महिलेचा समावेश असून हा रुग्ण मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे. तर दिवसभरात दोन रुग्णास डिस्चार्ज दिला. सद्यःस्थितीत जिल्ह्यात २७ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...