आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधम्म मंगलम बहुउद्देशीय संस्थेच्या चित्तविवेका जागतिक ध्यान साधना केंद्र शेलू नजीक व भटोरी येथे ९ एप्रिल रोजी एकदिवसीय ध्यान साधना शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये नावयाना मॉनेस्ट्री श्रीलंका येथून विनयशील भंते बोधिधर्मन हे मार्गदर्शन व प्रवचन करण्यासाठी आले होते. खरा बुद्धीजम भारतामधून नष्ट होण्याची कारणे समजावत त्यांनी आज धम्माच्या पुनरुज्जीवनासाठी विनय कसे आवश्यक आहे यावर प्रकाश टाकला. भिक्खूंनी आणि उपासकांनी विनय कसे पालन करावे हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने सविस्तररित्या भंते बोधिधर्मन यांनी उपासकांना समजावले.
प्रत्येक दुःखाचे कारण आसक्ती व तृष्णा आहे. यापासून आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये कसे दूर राहता येईल, याबद्दल सुद्धा भंते यांनी मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनामध्ये सतत जागृत राहून आपली सती व प्रज्ञा कशी विकसित करता येईल यावर सुद्धा त्यांनी प्रकाश टाकला. या दिवशी धम्म मंगलम संस्थेच्या चित्त विवेका ध्यानसाधना केंद्राच्या बांधकामास सुरुवात झाली. याप्रसंगी मुंबई, नागपूर, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, औरंगाबाद येथून जवळपास १०० साधक उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.