आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • One Day For My Victim ; Officers On Farmers' Dam, Agriculture Department Officials Along With University Office Bearers Guided| Marathi News

उपक्रम:एक दिवस माझ्या बळीराजासाठी ; अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह विद्यापीठ पदाधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि कृषी विभाग, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत मौजे टाकरखेड हेलगा, ता. चिखली, जि. बुलढाणा येथे ०३ सप्टेंबर २०२२ रोजी भेट देण्यात आली. अधिकारी पदाधिकाऱ्यांनी पंढरी यशवंत गुंजकर यांच्या शेतावर उपस्थिती लावली. या वेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संशोधन विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील, विभागीय सहसंचालक अमरावती विभाग किसन मुळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा डॉ. अनिल तारू, डॉ. जगदीश वाडकर, शास्त्रज्ञ विस्तार शिक्षण, डॉ. प्रवीण देशपांडे, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा, डॉ. दिनेश कानवडे, शास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र, बुलढाणा, डॉ. सतीशचंद्र जाधव, प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, बुलढाणा, संतोष डाबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा, अमोल शिंदे, तालुका कृषी अधिकारी, चिखली आदींची उपस्थिती होती. माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाचे प्रास्ताविक श्री. डाबरे यांनी केले. विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी शेतकरी बांधवांनी खचून न जाता शासनाच्या योजनाचा लाभ घेऊन अधिक शेतीतील उत्पन्न वाढवावे असे आवाहन केले आणि माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमास सर्वांनी प्रतिसाद देऊन आपल्या समस्या सर्व विभागातील साधिकारी कर्मचारी जे गावात येतील त्यांना कळवाव्यात असे आवाहन केले. डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील कीड उपद्रवाचा प्रकार ओळख लक्षात घेऊन सर्वेक्षण करून गरज असेल तरच कीटकनाशकांचा वापर करावा व पीक संरक्षणासाठी होणारा खर्च कमीत कमी करावा असे त्यांच्या मार्गदर्शनात संबोधित केले. डॉ. खर्चे यांनी विद्यापीठ प्रसारित तंत्रज्ञान व वाणांचा अधिकाधिक वापर करावा असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले.

ज्यांच्या शेतावर कार्यक्रम आयोजित केला होता असे श्री. गुंजकर यांनी नवीन पिढीने व्यसनांच्या आहारी न जाता शासनाच्या विविध योजनाचा उत्साहाने लाभ घेऊन शेतामध्ये प्रत्यक्ष कष्ट करावे आणि नवनवीन प्रयोग करावेत असे आपल्या अनुभव कथनातून आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. भाले यांनी कृषी विद्यापिठाचा आणि सर्व सलग्न कृषि संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्राचा आणि कृषी विभागाचा प्रत्येक दिवस शेतकऱ्याचा आहे असे सांगत आजच्या काळात जे विकेल ते पिकेल या भावनेतून आणि बाजारपेठेमध्ये ज्या शेतीमालाला भाव आहे. ती पिके घेणे आज काळाची गरज आहे असे सांगितले.

आपल्या शेतावर मुंग, उडीद, तूर, जवस, ज्वारी, बाजरी, गहू, तेलवर्गीय पिके लागवड करून सर्व अन्नधान्य घरीच तयार करावीत आणि उर्वरित धान्य प्रक्रिया करून उद्योग उभा करावेत आणि विक्री व्यवसायात उतरावे असे आवाहन केले. कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थिती राहिले आणि कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ. जगदीश वाडकर यांनी तर आभार प्रदर्शन अमोल शिंदे, तालुका कृषी अधिकारी, चिखली यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...