आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उष्णतेची लाट:उष्णतेच्या लाटेच्या इशाऱ्यामुळे एक ते  चार वर्षांच्या फळझाडांची काळजी घ्यावी

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात यंदा उष्णतेच्या लाटांची संख्या, उष्ण दिवसांची संख्या वाढल्याने नव्या फळझाडांना फटका बसण्याची शक्यता शेती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. पुढील पाच दिवस पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यामुळे एक ते चार वर्षाच्या फळझाडांची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी केले.

सद्यःस्थितीत कमाल तापमानात वाढ झाल्याने बाष्पीभवन वाढले आहे. परिणामी लहान फळझाडांना फटका बसत आहे. त्यात पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. त्यामुळे नवीन लागवडीच्या १ ते ४ वर्षांच्या फळझाडांना पऱ्हाटी व तुराटीचे छोटे मंडप तयार करावेत व फळझाडांना पहाटे किंवा सायंकाळी ओलीत करावे, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.

आंबिया बहर फळधारणा असलेल्या संत्रा बागांत, फळ गळती रोखण्यास, फळे चांगली ठेवण्यासाठी उष्ण हवामानात पाणी द्यावे. वाढत्या तापमानाने ठिबकद्वारे १, ५, ८ व १० वर्षावरील झाडांना अनुक्रमे १७, १०२, १८८ व २३५ लिटर पाणी प्रती दिवस व प्रती झाडास जमिनीनुसार पाणी द्यावे. लिंबू फळझाडांना वाढत्या तापमानाने ठिबकद्वारे १, ५, ८ व १० वर्षावरील झाडांना अनुक्रमे ११, ४२, ७३ व १०८ लिटर पाणी प्रती दिवस व प्रती झाडास जमिनीनुसार पाणी द्यावे. उष्ण वाऱ्याच्या स्थितीमुळे मोसंबी व संत्रा फळांची गळती नियंत्रित करण्यासाठी चुना, जिबर्लिक ऍसिड १.५ ग्रॅम + युरिया १ किलो + १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ओलावा कमी राहिल्याने संत्रा बागांत साल फुटणे, फाटणे होऊ शकते. त्यामुळे बुरशीजन्य किंवा इतर रोगांच्या प्रवेशापासून संरक्षणासाठी १ ते १.५ मीटर झाडावर बोर्डो पेस्ट (१:१:१०) लावावी, असेही सांगीतले.

बातम्या आणखी आहेत...