आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदयार्थ्यांसाठी महत्वाची बातमी:11 वी प्रवेशासाठी उरले केवळ 2 दिवस; प्रवेश प्रक्रियांची शेवटची यादी 1 ऑगस्टला लागणार

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेश प्रक्रिया या कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरच होत आहे. त्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्याप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. अकरावी प्रवेशासाठी आता शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत. सोमवारी (1 ऑगस्ट) तिसरी आणि शेवटची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे.

अकरावीसाठी प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली असून त्याअधीन राहूनच प्रवेश देण्यात येत आहेत. सीबीएसई व आयसीएसई निकाल उशीरा जाहीर झाले. त्यामुळे त्यांच्यासाठीही जागा रिक्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवेशाबाबत काही अडचणी आल्यास जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयातील उच्च माध्यमिक शिक्षण विभागात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मागील चार वर्षापासून अकोला शहरामध्ये केंद्रीय पद्धतीने अकरावीचे प्रवेश घेण्यात येत होते. मात्र, यंदा ही पद्धती रद्द करण्यात आली. महाविद्यालय स्तरावर प्रवेश होत आहे. 30 जुलै रोजी तिसरी प्रतिक्षा यादी जाहीर होणार आहे. 1 ऑगस्ट रोजी प्रवेश सुरू होतील. यानंतर 2 ऑगस्ट रोजी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी प्रवेशाबाबतच अहवाल शिक्षण विभागाला सादर करायचा आहे.

अशी राबवण्यात आली प्रवेश प्रक्रिया

- 20 ते 23 जुलै प्रवेश यादीनुसार प्रवेश देणे

- 25 जुलै रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादी लावणे

- 26 ते 27 जुलै प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे

- 28 जुलैला दुसरी प्रतीक्षा यादी लावणे

- 29 जुलै रोजी दुसऱ्या प्रतीक्षा यादी प्रमाणे प्रवेश देणे

- 30 जुलै तिसरी प्रतीक्षा यादी लावणे

- 1 ऑगस्ट तिसऱ्या प्रतीक्षायादीनुसार प्रवेश देणे

बातम्या आणखी आहेत...