आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅलन्स खाते:शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे झीरो बॅलन्स खाते उघडा

अकाेला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रलंबित अनेक मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेच्या वतीने दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. या वेळी विविध समस्यांबाबत बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

खासगी शिक्षक व विद्यार्थ्यांचे बँकेशी निडीत काही समस्या आहेत. हे प्रश्न सुटण्यासाठी शिक्षकांकडून काही िदवसांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. विद्यार्थी-शिक्षकांच्या समस्या सुटत नसल्याने त्यांना अनेक अचडणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेतर्फे दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक प्रशासन अधिकारी प्रशांत उकंडे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी गजेंद्र शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आली. चर्चा करण्यासाठी राज्य शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनीष गावंडे, उपाध्यक्ष अलकेश खेंडकर, सहसचिव अविनाश मते, सहसचिव नरेंद्र चिमणकर, सहसचिव गजानन सवडतकर, अकोला जिल्हाध्यक्ष वसीम मुजाहीद, दत्ता घोंगे, मोहम्मद शोएबुद्दीन, सुदर्शन भिसे, धम्मपाल वाहुरवाघ, जयसिंग मचले, फईम असीम आदी शिक्षक उपस्थित होते.

या मुद्यांवर केली चर्चा
महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेने अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांशी पुढील महत्त्वाच्या मुद्दांवर चर्चा केली. मिनिमम बॅलन्स दोन हजार रुपये असावे. ४० टक्के अनुदानित शिक्षकांना कर्ज देण्यात यावे. बँकेमार्फत पगारदार कर्मचाऱ्यांचा काढण्यात आलेल्या अपघात विमा बाबतचे कागदपत्रे कर्मचाऱ्यांना द्यावे. २० व ४० टक्के अनुदानित शिक्षकांना अपघात विमा योजनेचा लाभ देण्यात यावा. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे झीरो बॅलन्स अकाउंट उघडण्यात यावे.

बातम्या आणखी आहेत...