आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचारी रडारवर:पीएचसींचे ऑपरेशन; सहा डाॅक्टरांना नाेटिसा; दांडीबहाद्दर कर्मचारी रडारवर

अकाेला6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील प्राथमिक आराेग्य केंद्रांची (पीएचसी) जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पथकांनी अचानकपणे केलेल्या पाहणीचा अहवाल जवळपास तयार झाला आहे. पाहणीत बंद आढळलेल्या तीन प्राथमिक आराेग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नाेटीस बजावली आहे. एकूण ५० टक्के कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे समाेर आले आहे. किती कर्मचारी हजर व गैरहजर हाेते, याचीही आकडेवारी तयार केली आहे.

लवकरच या सर्वांवर थेट कारवाईचा बडगाद जि.प. प्रशासनाकडून उगारण्यात येणार आहे. त्यामुळे दांडीबहाद्दर अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. शासन आराेग्य सेवेसाठी काेट्यवधींचा खर्च करते. गाेळ्या, औषधी, इमारती, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आदींसाठी िनधी उपलब्ध करुन देण्यात येताे. हा खर्चही हाेताे. मात्र यासर्वांमधून रुग्णांना दर्जेदार व वेळेवर आराेग्य सेवा मिळत नसल्याचे अनेकादा िवविध यंत्रणांनी केलेल्या पाहणीत दिसले हाेते. साेमवारी जि प., पं. स.च्या पथकांनी केलेल्या पाहणीत तीन ठिकाणी कुलूप तर काही िठकाणी डाॅक्टर, आराेग्य कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळले हाेते.

जिल्हा परिषद प्रशासन भत्ते वसूल करणार काय?
जि. प.चे काही अधिकारी-कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे अनेकदा समाेर आले. आराेग्य यंत्रणेतील प्राथमिक आराेग्य केंद्र व उपकेंद्रात डाॅक्टर, आराेग्य कर्मचारी वेळेवर येत नाहीत. आता तर काही जण तर मुख्यालयी थांबत नसल्याचेही आढळले. अधिकाऱ्यांना शासकीय निवासस्थान आहेत. शासनाकडून गलेलठ्ठ वेतन व घरभाडे भत्ताही घेऊनही जनतेला सेवा न देता त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठाेर कारवाई केव्हा हाेणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे.

आता पुढे काय कारवाई हाेणार?
गैरहजर आढळलेल्या डाॅक्टरांना कारणे दाखवा नाेटीस बजावली असून, त्यांच्याकडून उत्तरे मागवली आहेत. आता गैरहजर असलेल्या काेण प्रशिक्षण किंवा शासकीय कामासाठी गेले हाेते काय, हेही पाहण्यात येत आहे. मात्र ते शासकीय कामासाठी गेले असल्यास त्याची नाेंद आहे काय, हेही तपासण्यात येत आहे. किंवा प्रशिक्षण, कार्यशाळेसाठी गेलेल्यांना तसा पुरावाही सादर करावा लागणार आहे. मात्र जि.प.चा कारवाईबाबतचा इतिहास लक्षात घेता ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने हाेते कि नाही, हेही पाहावे लागणार आहे.

हजर-गैरहजर
जि. प.च्या १४,प.स. च्या ७ पथकांनी २१ प्राथमिक आराेग्य केंद्राच्या रात्री केलेल्या पाहणीत अनेक जण गैरहजर आढळले. प्राथमिक आराेग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी २५ गैरहजर ८ जण हजर हाेते. सहाय्यक परिचारिका ६ हजर, २ दाेन गैरहजर हाेत्या. स्टाफ नर्स १ हजर,४ गैरहजर हाेत्या. कंत्राटी परिचारिका ५ ही जणी हजर हाेत्या.

महिला सुपर वायझर ५ गैरहजर, ३ कार्यरत हाेत्या. पुरुष सुपर वायझर ७ गैरहजर, ६ हजर हाेते. औषध निर्माता ४ हजर तर ४ जण गैरहजर हाेते. लिपिक ७ उपस्थित तर ७ गैरहजर हाेते.सफाई कर्मचारी ६ हजर, ६ गैरहजर हाेते.,चालक ५ हजर, १ गैरहजर प्राथमिक आराेग्य केंद्रात १४२ जणांनी मुख्यालयी राहणे अपेक्षित आहे. मात्र ७१ जण हजर,७२ गैरहजर असल्याचे पाहणीत दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...