आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशाची संधी:आरटीईअंतर्गत तिसऱ्या फेरीदरम्यान 128 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी ; पालक, विद्यार्थ्यांची धावपळ

अकोला17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिनियमाअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांत प्रवेशासाठी तिसरी फेरी झाली असून, यात १२८ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी िमळाली. प्रथम सोडतीत नविड झालेल्या १,९२० पैकी १,४२६ मुलांचा यापूर्वीच प्रवेश निश्चित झाला. त्यामुळे उर्वरित ४९४ जागांपैकी सध्या प्रतीक्षा यादीतून प्रवेशाबाबतची प्रक्रिया सुरू आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित शाळांत प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. आरटीईमुळे पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांतूून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे. यंदा आरटीई कोट्यातून प्रवेश मिळावा, यासाठी अर्ज करणाऱ्या पालकांची संख्या ६ हजार २ आहे. साेडतीने प्रवेशाची संधी मिळालेल्या मुलांच्या कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रियाही १० मे रोजी संपली. प्रतीक्षा यादीतील मुलांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आरटीईची स्थिती अशी नोंदणीकृत शाळा : १९६ आरक्षित जागा : १९९५ प्राप्त अर्ज : ६००३ जास्त प्राप्त अर्ज : ४००७ प्रतीक्षा यादीतील नविड : ५५९ प्रवेशित विद्यार्थी : २५६

बातम्या आणखी आहेत...