आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्च एन्डला संप:खासगीकरणाच्या धोरणाला विरोध, आजही कामकाज राहणार बंदच; बँकांची उलाढाल,‘महसूल’चे कामकाजही प्रभावित

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पदोन्नती प्रक्रियेसह विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवारी लाक्षणिक संप केला. जिल्ह्यात ३०० पेक्षा जास्त कर्मचारी एक दिवसाच्या संपात सहभागी झाले होते. संपाचा परिणाम जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजावर झाल्याचे दिसले. मात्र अत्यावश्यक कामासाठी काही कर्मचारी कामही करताना दिसून आले.

राज्यातील महसूल विभागात महसूल सहाय्यकांची पदे रिक्त असून, एका महसूल सहाय्यकाकडे २ ते ३ संकलनाचा अतिरिक्त कार्यभार आहे. परिणामी उपलब्ध कर्मचाऱ्यांवरच कामाच ताण आहे. महसूल सहाय्यकांची रिक्त पदे भरावी, असे संघटनेचे म्हणणे आहे. विविध मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरवा करूनही आश्वासन मिळत आहे. याची पूर्तता होत नसल्याने आंदोलन करावे लागत असल्याचे कर्मचारी संघटनेद्वारे कळवले.

..त्यामुळे प्रक्रिया अन्यायकारक : शासनाने १० मे २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार नायब तहसीलदार संवर्ग राज्यस्तरीय संवर्ग म्हणून घोषित केला. त्यानुसार अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांच्या सेवाज्येष्ठता याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याबाबत शासनाने पत्र काढले. मात्र अव्वल कारकून व मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्याने त्यांच्या याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया ही अन्यायकारक आहे. ही प्रक्रिया राज्यस्तरावर होत असल्याने कर्मचाऱ्याची बदली राज्यात कुठेही होते. हीच प्रक्रिया पूर्वी विभागीयस्तरावर होती. त्यामुळे हे पत्र रद्द करा, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

असे झाले व पुढे होणार आंदोलन : सेमवारी २१ मार्चला आंदोलनाला सुरुवात केली. या दिवशी जेवणाच्या सुट्टीत द्वारावर निदर्शने करुन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. बुधवारी २३ मार्चला काळ्या फिती लावून काम केले. साेमवारी २८ मार्चला एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. ४ एप्रिल पासून बेमुदत संपाचा इशारा संघटनेने दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...