आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:संत्रा फळगळ अभ्यास समितीची सभा ; फळगळ रोखण्यासाठी उपाययोजनांवर मार्गदर्शन

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत्रा फळगळीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर कृषी विभाग व प्रगतशील संत्रा बागायतदार शेतकरी यांचा समावेश असलेल्या अभ्यास समितीच्या वतीने सभा घेण्यात आली. संत्रा फळगळ व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मान्यवरांनी या सभेत मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी कुलगुरू तथा संत्रा फळगळ समितीचे अध्यक्ष डॉ. विलास भाले होते. कृषी विद्यापीठे, केंद्रीय लिंबूवर्गीय फळे संशोधन संस्था, राज्य शासनाचा कृषी विभाग व प्रत्यक्ष संत्रा बागायतदार शेतकरी यांनी संयुक्तरीत्या संत्रा फळगळ व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना केल्यास या समस्यांचे निराकरण करणे शक्य असल्याचे ते म्हणाले. संत्रा फळगळ समस्येवर संदेश देताना हवामानाच्या अंदाजानारूप प्रसारित करण्याबाबत सूचना दिल्या. संत्रावाण विकास प्रक्रियेमध्ये विद्यापीठ व केंद्रीय संस्था यांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देशित केले.

समितीच्या सभेमध्ये डॉ. दिलीप घोष, संचालक केंद्रीय लिंबूवर्गीय फळे संशोधन संस्था, नागपूर, डॉ. एस. एस. माने, संशोधन संचालक तथा विभाग प्रमुख वनस्पती रोप शास्त्र विभाग, डॉ. डी. बी. उंदीरवाडे. संचालक विस्तार शिक्षण तथा विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, डॉ. पी. के. नागरे, सहयोगी अधिष्ठाता. कृषी महाविद्यालय, अकोला, के. एस. मुळे, विभागीय कृषी सहसंचालक अमरावती, आर. डी. साबळे विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर, डॉ. एस. जी. भराड, विभागप्रमुख फळशास्त्र विभागयांच्यासह मनोज जवंजाळ, रमेश जीचकार, डॉ. दास, डॉ. मेश्राम, डॉ. डी. एच. पैठणकर, डॉ. एन. आर. कोष्टी, डॉ. व्ही.यु. राऊत याच्यासह अनेकांची उपस्थिती होती. अभ्यास समितीच्या अंतर्गत स्थापन केलेल्या उपसमिती नागपूर विभाग व उपसमिती अमरावती विभाग यांच्या चमू प्रमुखांनी प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी देणे, शेतीशाळा, मासिक संदेश नुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे, सततच्या पावसामुळे संत्रा फळबागेवर होणारा दुष्परिणाम इत्यादी बाबत विभागात केलेल्या कार्यांचा आढावा सादर केला.

बातम्या आणखी आहेत...