आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियंत्यांना धरले धारेवर:बंधाऱ्याचे देयक थकल्याने साहित्य जप्तीचा आदेश

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेल्हापुरी बंधाऱ्याचे देयक प्रलंबित असल्याने मंगळवारी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन िवभागातील साहित्य जप्तीची कारवाई हाेणार हाेती. मात्र प्रलंबित असलेल्या देयकापाेटी सध्या २ लाख रुपये अदा करण्याची ग्वाही लघुसिंचन वि​​​​​​​भागाकडून देण्यात आल्यानेही कारवाई टळली.

जप्तीची वेळ येईपर्यंत देयक अदा करण्यासह अन्य बाबींची माहिती का िदली नाही, असा सवाल करीत जि .प. अध्यक्षा, उपाध्यक्ष व सदस्यांनी अभियंत्यांना धारेवर धरले. प्रशासनाच्या बेताल कारभारामुळे सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यपद्धतीवर यानिमित्ताने प्रश्नचिन्ह िनर्माण झाले आहे.

िज.प.चा लघुसिंचन िवभाग अनेकदा वादात सापडला आहे. यापूर्वी बंधाऱ्यांमधील घाेटाळ्याप्रकरणी अभियंते, कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले हाेते. त्यानंतर यापूर्वी झालेल्या पंचायत राज समितीच्या दाैऱ्यातही काेल्हापुरी बंधाऱ्यांमधील वि​​​​​​​शेष दुरुस्तीतील जुन्या एेवजी नवीन लाेखंडी िनडल्स टाकणे व नवीन बंधाऱ्यांच्या कामांसाठीच्या पुरवठ्यातील मूल्यांकन नियबाह्यपणे रक्कम प्रदान करणे आदींवर चर्चा रंगली हाेती.

साहित्य काढले बाहेर
काेल्हापुरी बंधाऱ्याची रक्कम मिळत नसल्याने साहित्य जप्तीच्या कारवाईला प्रारंभ केला. यात प्लास्टिक व फाेमच्या खुर्च्या, कुलर, टेबलसह अन्य साहित्य लघुसिंचन िवभागाच्या बाहेर आणण्यात आले. तेवढ्यात िज.प.च्या आवारात असलेल्या सदस्यांनी तेथे धाव घेतली. त्यानंतर कंत्राटदार व कार्यकारी अभियंत्यांमध्ये चर्चा झाली. नंतर ही कारवाई टळली.

बातम्या आणखी आहेत...