आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेल्हापुरी बंधाऱ्याचे देयक प्रलंबित असल्याने मंगळवारी जिल्हा परिषदेच्या लघूसिंचन विभागातील साहित्य जप्तीची कारवाई होणार होती. मात्र प्रलंबित असलेल्या देयकापाेटी सध्या 2 लाख रुपये अदा करण्याची ग्वाही लघुसिंचन विभागाकडून देण्यात आल्याने ही कारवाई टळली.
जप्तीची वेळ येईपर्यंत देयक अदा करण्यासह अन्य बाबींची माहिती का दिली नाही, असा सवाल करीत जि.प. अध्यक्षा, उपाध्यक्ष व सदस्यांनी अभियंत्यांनी धारेवर धरले. प्रशासनाच्या बेताल कारभारामुळे सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यपद्धतीवर यानिमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एका कंत्राटदाराने सावरगाव परिसरात बांधलेल्या काेल्हापुरी बंधाऱ्याच्या देयकाची रक्कम थकल्याने न्यायालयात धाव घेतली हाेती. अखेर जप्तीची कार्यवाहीसाठी मंगळवारी कंत्राटदाराने आदेश घेत जि.प.च्या आवारात धाव घेतली. मात्र देयक अदा करण्याच्या ग्वाही दिल्याने कार्यवाही टळली.
असे आहे प्रकरण
2012 मध्ये सदगुरु कंन्स्ट्रक्शन कंपनीने 35 रुपये खर्च करून काेल्हापुरी बंधारा बांधला. यासाठी जवळपास 30 लाख रुपये अदाही करण्यात आले. मात्र उर्वरित देयक प्रलंबित हाेते. त्यामुळे त्यांनी लघुसिंचन विभागाकडे पाठपुरावा केला. देयक मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने 2019 मध्ये व्याजासह रक्कम अदा करण्याचा आदेश दिला. यात मूळ देयक 6 लाखन 35 हजार आणि व्याज 2 लाख 6 हजाराचा समावेश हाेता.
साहित्य काढले बाहेर
रक्कम मिळत नसल्याने सािहत्य जप्तीच्या कार्यवाहीला प्रारंभ केला. यात प्लास्टिक व फाेमच्या खुर्च्या, कुलर, टेबलसह अन्य सािहत्य लघुसिंचन विभागाच्या बाहेर आणण्यात आले. तेवढ्यात जि.प.च्या आवारात असलेल्या सदस्यांनी तेथे धाव घेतली. चर्चा झाली. नंतर ही कार्यवाही टळली.
व्याजाचाल तिढा
कार्यवाही टळल्यानंतर जि.प. अध्यक्षा संगिता आढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, माजी अध्यक्षा तथा िवद्यमान सदस्या पुष्पा इंगळे यांनी लघुसिंचन विभागाच्या अभियंत्यांना अध्यक्षांच्या कक्षात पाचारण केले. जप्तीच्या कार्यवाहीची मािहती वेळीच का दिली नाही, थकित रक्कम अदा हाेण्यासाठी निर्णय घेता आला नसता काय, असे एक ना अनेक सवाल करीत अध्यक्षा व सदस्यांनी अभियंत्यांना जाब िवचारला. मार्च महिन्यापर्यंत निधी प्राप्त झाल्यानंतर देयक अदा करण्यात येणार असल्याचे अभियंत्यांनी सांगितले. यावर मूळ देयक तर अदा हाेईल, मात्र थकित रक्कमेवरील 2 लाख 6 हजार रुपयांचे व्याज काेठून अदा हाेईल, असा तिढा निर्माण झाला. यावर संबंधित अभियंते, अधिकाऱ्यांकडून व्याजाची रक्कम वसूल करावी, असे काही सदस्य म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.