आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा खळबळ:शिक्षणाधिकाऱ्यांसह सेवा निवृत्त लिपीकाच्या विभागीय चौकशीचे आदेश; काम योग्यरित्या​​​​​​​ न केल्याचा फटका

अकोला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी डॉ. शाहिन सुलताना आणि सेवानिवृत्त लिपिक गोपाल मुळे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांबाबत विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी दिले आहे. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

महापालिकेत गोपाल मुळे हे लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे शिक्षक सेवा निवृत्त झाल्या नंतर पेन्शन प्रकरण, सेवा पुस्तक आदी कामे होती. मात्र ही कामे करताना त्यांनी कामात हरगर्जीपणा केला. ही बाब गोपाल मुळे जानेवारी महिन्यात सेवा निवृत्त झाल्या नंतर समोर आली. शिक्षक सेवा निवृत्त झाल्या नंतर त्यांना पेन्शन लावताना संबंधित शिक्षकांवर काही देणी आहेत का? या देणींचा त्यांच्याकडून भरणा करुन घेणे, त्यानंतर पेन्शन सुरू करणे तसेच कोणते शिक्षक पेन्शनसाठी पात्र आहेत? याबाबत कोणतीही माहिती न घेता, काही शिक्षकांना पेन्शन लावली तर काहींना पेन्शन सुरू केली नाही. शिक्षकांच्या आर्थिक बाबींची योग्यरित्या नोंद केली नाही. या बाबी गोपाल मुळे सेवा निवृत्त झाल्या नंतर समोर आल्या. हा प्रकार कर्तव्यात कसुर असल्याचा ठपका प्रशासनाने त्यांच्यावर ठेवला. तर शिक्षण विभागाच्या प्रमुख म्हणून तत्कालीन शिक्षणाधिकारी डॉ.शाहिन सुलनाता यांची ही सर्व कामे योग्यरित्या होत आहेत की नाहीत? याकडे लक्ष देणे आणि ही कामे योग्यरित्या होत नसतील तर संबंधितांकडून ती योग्यरित्या करवुन घेणे, ही जबाबदारी त्यांची होती.

तसेच काही शिक्षक अधिसंख्य आहेत का? ही जबाबदारी तत्कालीन शिक्षणाधिकारी डॉ.शाहिन सुलताना यांनी योग्यरित्या पार पाडली नसल्याचा ठपका प्रशासनाने त्यांच्यावर ठेवला आहे. या बाबी आर्थिक प्रकरणांशी निगडीत असल्याने तत्कालीन शिक्षणाधिकारी डॉ.शाहिन सुलताना आणि सेवा निवृत्त लिपिक गोपाल मुळे यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी दिले आहे.

यापूर्वी आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी काही दिवसांपूर्वी तीन शिक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ केले होते. बडतर्फ केल्याने त्यांना सेवा निवृत्ती नंतर मिळणारे फायदे बद झाले. या प्रकारामुळेच शिक्षकांसह कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...