आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 10 - 11 डिसेंबर 2022 दरम्यान ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवसीय ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसह, ग्रंथदिंडी,परिसंवाद,व्याखान, एकपात्री प्रयोग आदी भरगच्च कार्यक्रमांची साहित्य रसिक व ग्रंथप्रेमींना खास मेजवानी असणार आहे, अशीमाहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुल वानखडे यांनी दिली आहे. ग्रंथोत्सवाचा प्रारंभ शनिवार दि. 10 रोजी सकाळी 12 वाजता ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने होणार आहे.
उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी एक वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती संगिता अढाऊ, खासदार ॲड. संजय धोत्रे, विधान परिषद सदस्य आ. डॉ. रणजीत पाटील, आ. अमोल मिटकरी, आ. ॲड. किरण सरनाईक, आ. वसंत खंडेलवाल, विधान सभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित आहेत.
दुसऱ्या सत्रात दुपारी 3 वा. ‘संगणकीय युगात ग्रंथाचे स्थान’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रतिमा इंगोले या परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषवणार असून ज्येष्ठ साहित्यिक मधुभाऊ जाधव, ल.रा.तो.वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. स्वाती दामोदरे, श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. श्रद्धा थोरात आणि विदर्भ साहित्य संघाच्या (अकोला) सचिव सीमा रोठे यांचा सहभाग असणार आहे तर चंद्रकांत चांगदे परिसंवादाचे सूत्रसंचालन करतील. याच दिवशी सायंकाळी नितीन शेगोकार यांच्या ‘छु लो आसमान’ या विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.
रविवार दि. 11 रोजी पहिल्या सत्रात सकाळी 11 वा. ‘ग्रंथाने मला काय दिले’ विषयावर परिसंवाद होणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे परिसंवादाच्या अध्यस्थानी असतील तर महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, ग्रंथमित्र एस.आर.बाहेती आणि बाबुजी देशमुख सार्वजनिक वाचनालयाचे सचिव अनुराग मिश्र यांचा सहभाग असेल राम मुळे या परिसंवादाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असतील. त्यानंतर दुपारी दोन वा. ‘अडम धडम’ या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी राजाभाऊ देशमुख राहतील तर धीरज चावरे, प्रशांत वरईकर, हिम्मत ढाळे, देवलाल तायडे हे सहभागी होतील.त्यानंतर अकोट येथील हर्षदा इंदाने ‘मी वाचन संस्कृती बोलते’ हा एकपात्री प्रयोग सादर करतील. यानंतर ग्रंथोत्सवाचा समारोप होईल. समारोप सत्राचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार राहणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.