आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक महिला‎ दिन:शहरात महिलांसाठी निःशुल्क‎ आरोग्य महाशिबिराचे आयोजन‎

अकाेला17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅड. धनश्री देव अभ्यंकर‎ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नीलेश देव मित्र‎ मंडळातर्फे जागतिक महिला‎ दिनानिमित्त निःशुल्क आरोग्य‎ महाशिबिराचे आयोजन केले आहे. या‎वेळी पॅथॉलाजी ‎चाचण्या करणार‎ आहे. हे कार्यक्रम‎सातव चौकात‎बुधवार, ८ मार्च‎रोजी सकाळी ९ ते‎दूपारी १२ पर्यंत‎ आयोजित केले आहे.‎ नि:शुल्क आरोग्य महाशिबिराच्या‎ उदघाटक म्हणून जि. प. अध्यक्ष‎ संगीता अढाऊ, ज्येष्ठ मार्गदर्शिका‎ म्हणून प्रांजली देशमुख, प्रमुख पाहुण्या‎ म्हणून पुष्पा इंगळे यांची उपस्थिती‎ राहणार आहे.

यावेळी राहतील. डॉ.‎ आर. बी. हेडा, डॉ. तुलिका सिन्हा, डॉ.‎ कल्याणी महल्ले, डॉ. मदन महल्ले,‎ डॉ. निखिल लहाने, डॉ. संदीप इंगळे,‎ डॉ. प्रणय महल्ले, डॉ. निखिल बोर्डे,‎ डॉ. सुमेध खंडारे आदींची उपस्थिती‎ राहणार आहे. ब्लड शुगर,फास्टिंग‎ पोस्टिंग टेस्ट, डॉ. हेडगेवार रूग्णालय‎ व अणूसंधान केंद्र व नीलेश देव मित्र‎ मंडळाच्या संयुक्त सहकार्याने‎ करण्यात येणा आहे. फास्टिंग टेस्ट‎ उपाशी पोटी सकाळी ७.३० ते ९.३०,‎ पोस्टिंग टेस्ट जेवणानंतर दीड तासांने‎ सकाळी ११.३० ते १.३० यासाठी पूर्व‎ नोंदणी आवश्यक आहे. ९८६०१२२५५५‎ या क्रमांकावर पुर्व नोंदणीचे आवाहन‎ नीलेश देव मित्र मंडळाने केले आहे.‎ जठारपेठेतील स्वीट मार्ट व उपहारगृह‎ यांना ओला, काेरडा कचरा‎ वर्गीकरणाकरता डस्टबिन वाटप‎ करणार आहे. या वेळी उपस्थित‎ राहण्याचे आवाहन केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...