आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रामकथा, कीर्तन महोत्सवाचे आयोजन; श्री कर्ता हनुमान मंडळाच्या वतीने घेण्यात आला पुढाकार

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत सतरा वर्षांपासून सामाजिक व धार्मिक सेवा कार्यात सेवारत असणाऱ्या स्थानीय डाबकी रोड परिसरातील वानखडे नगर येथील श्री कर्ता हनुमान मंडळाच्या वतीने आयोजित श्री रामकथा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर प्रांगणात श्रीराम नवमी ते हनुमान जयंती पर्वात ९ ते १६ एप्रिल पर्यंत श्रीराम कथा व कीर्तन उत्सव होणार आहे.

मेहकर येथील लोणी गवळीचे रामायणाचार्य हभप विश्वर दास महाराज वैष्णव यांच्या अमृतवाणीतून नित्य स १० ते १२ व दु. ३ ते ५ पर्यंत रामकथा होणार असून नित्य रात्री ८ ते १० वा पर्यंत कीर्तन होणार आहे. या कीर्तनात ९ एप्रिल रोजी अकोला येथील हभप शिवाजी महाराज अमृतकर यांचे कीर्तन होणार आहे. १० एप्रिल रोजी शेगाव येथील हभप हरिदास महाराज आखरे, ११ एप्रिल रोजी हिंगणा येथील हभप सुपळाजी महाराज उजाडे, १२ एप्रिल रोजी आळंदी येथील हभप. उमेश महाराज भाकरे, १३ एप्रिल रोजी म्हैसपूर येथील हभप केशव महाराज मोरे, १४ एप्रिल रोजी वरुड जउळका येथील विनोदाचार्य हभप गणेश महाराज शेटे, १५ एप्रिल रोजी नांदगाव खंडेश्वर येथील उमेश महाराज जाधव, तथा १६ एप्रिल रोजी या उत्सवाची कळंबा कसुरा येथील हभप प्रल्हाद महाराज ढोले यांचे काल्याचे किर्तन होऊन उत्सवाचे समापन होणार आहे.

या सप्ताहात सकाळी ५ वाजता काकड आरती होऊन सायंकाळी ५ वाजता हरिपाठ होणार आहे. किर्तन उत्सवात संगीतकार हभप गजानन महाराज लांडे, तबलावादक हभप तुषार देशमुख,खामनी येथील हभप अरुण महाराज, गायनाचार्य हभप सतीश महाराज मेंढे, पद्माकर मोरे गुरुजी, अकोला हभप संतोष महाराज सुरजुसे, नेर पळसोचे हभप गजानन माळी तर मृडुंगाचार्य म्हणून हभप श्रीराम महाराज दुर्गे, चोपदार म्हणून भागवत बुवा,तथा प्रकाश कुलट, दत्ता वैद्य, गजानन माळी, सिसोदिया आदी टाळकरी मंडळी साथसंगत करणार आहे. १४ एप्रिल रोजी ११ वाजता भव्य रोगनिदान शिबिर आयोजित केले आहे. या उत्सवाचा महीला पुरुष भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन श्री कर्ता हनुमान मंडळाच्या वतीने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...