आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश उत्सवाचे औचित्य:बाल शिवाजी शाळेमध्ये सामूहिक अथर्वशीर्षाचे पंचसहस्रावर्तन कार्यक्रम

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

त्वमेव केवलं कर्तासि ‘ असे म्हणत अहंकाराची ज्योत विझविणाऱ्या मन व बुद्धीला शांत ठेवणाऱ्या अथर्वशीर्षाचे पठण चैतन्यमय, भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. गणेश उत्सवाचे औचित्य साधून ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळेत मनाला प्रसन्न करणारे अथर्वशीर्षाचे पंचसहस्रावर्तन करण्यात आले.

सर्वप्रथम संस्थेचे सचिव गद्रे सर, शाळा समिती सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी गणेश पूजन केले. सर्व विद्या व कलांचे अधिष्ठान असलेल्या श्री गणेशाने हिंदू संस्कृती व्यापून टाकली आहे. लहानापासून थोरांपर्यंत सर्वांची आराध्य दैवत असलेल्या या गणेशाचे संत महात्म्यांनी स्तवन केले आहे. अशा या सर्वव्यापी गणेशाला मनोभावे वंदन करून सुबुद्धी, विवेक व सुयशाचे मागणे मागून अथर्वशीर्षाच्या पंचसहस्रावर्तनाला सुरुवात केली. तत्पूर्वी सीमा देशपांडे यांनी गणपती अथर्वशीर्ष व त्याच्या आवर्तनाचे होणारे फायदे याबाबत माहिती दिली. आवर्तनाच्या उद्घोषाने संपूर्ण परिसर पवित्र व प्रसन्न झाला. अथर्वशीर्षाच्या पठणानंतर श्री. गणेशाची आरती करण्यात आली व प्रसाद वाटप करण्यात आले.

‘गणपती बाप्पा मोरया ‘ या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला. याप्रसंगी संस्थेचे सचिव मोहन गद्रे, शाळा समिती सदस्य रेणुका भाले, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जळमकर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे तसेच , शिक्षक वृंद व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण केले, अशी माहिती बाल शिवाजी शाळेच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...