आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 डिसेंबरला पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा:विविध 272 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार

अकोला2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार 8 डिसेंबरला पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 या वेळात करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा मेळावा होणार आहे.

या मेळाव्यात 272 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. तरी इच्छुक पात्रताधारकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

 • मेळाव्यात आवास फायनान्स सर्व्हीस साठी रिलेशन ऑफिसर- पात्रता बारावी,पदवीधर व पदवीधारक (१८ ते ३२ वयोमर्यादा) २० पदे,
 • रिलेशनशीप मॅनेजर- पात्रता कोणत्याही शाखेची पदवी (२१ ते ३२ वर्यामर्यादा) २० पदे,
 • टीमलेसे सर्व्हीसेस प्रा.लि. साठी- ट्रेनी इंजिनियर पात्रता-अभियांत्रिकी शाखेची पदवी (२१ ते २७ वयोमर्यादा) ५० पदे,
 • हेल्पर पदासाठी पात्रता किमान दहावी (१८ ते ३२ वयोमर्यादा) ५० पदे
 • क्यूस कॉर्प लि. साठी सेल्स एक्झिक्युटिव्हकरीता पात्रता-कोणत्याही शाखेची पदवी(२१ ते ३३ वर्यामर्यादा) ४५ पदे
 • सेल्स बँकिंगकरीता पात्रता- कोणत्याही शाखेची पदवी( २१ ते ३२ वर्यामर्यादा) ४० पदे
 • हिंदुजा लेयलँड प्रायनान्स लि. साठी मार्केटींग एक्झिक्युटीव्ह १० पदे
 • कलेक्शन एक्झिक्युटीव्ह १० पदे पात्रता-कोणत्याही शाखेची पदवी(२१ ते ३२ वर्यामर्यादा)
 • निर्माण मल्टीस्टेट को.ऑ.क्रेडीट सोसायटी, अकोलासाठी ब्रॅच एक्झिक्युटीव्ह/क्लार्ककरीता पात्रता- कोणत्याही शाखेची पदवी व एमएस-सीआयटी (२१ ते ४० वर्यामर्यादा) प्रत्येकी २० पदे.
 • कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र, वाडेगावसाठी प्रकल्प अधिकारी-पात्रता कृषी पदवीधर १ पद
 • भांडारपाल पात्रता-पदविका कृषी किंवा लाईव्हस्टॉक सुपरव्हायझरचे २ पदे
 • ॲग्रीकलचर इंजिनियर पात्रता-कृषी अभियांत्रीकी पदवी १ पद
 • पशूवैद्य पात्रता-पशूवैद्य पदवी ३ पदे (या सर्व पदाकरीता २१ ते ४० वर्यामर्यादा)

या प्रमाणे २७२ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी आपल्या बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो सह स्वखर्चाने उपस्थित रहावे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०७२४-२४३३८४९ व भ्रमणध्वनी क्रमांक ९६६५७७८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...