आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध 272 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार:गुरुवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त सहकार्याने गुरुवारी ८ डिसेंबरला पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत आयोजित केले आहे.

या मेळाव्यात २७२ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. इच्छुक पात्रताधारकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्तांनी केले आहे.

या मेळाव्यात आवास फायनान्स सर्व्हीससाठी रिलेशन ऑफिसर- पात्रता बारावी, पदवीधर व पदवीधारक (१८ ते ३२ वयोमर्यादा) २० पदे, रिलेशनशीप मॅनेजर- पात्रता कोणत्याही शाखेची पदवी (२१ ते ३२ वर्यामर्यादा) २० पदे, टीमलेसे सर्व्हीसेस प्रा.लि. साठी- ट्रेनी इंजिनियर पात्रता-अभियांत्रिकी शाखेची पदवी (२१ ते २७ वयोमर्यादा) ५० पदे, हेल्पर पदासाठी पात्रता किमान दहावी (१८ ते ३२ वयोमर्यादा) ५० पदे,

बातम्या आणखी आहेत...