आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:पांडुरंगाच्या मूर्तीचा निघाला वज्रलेप; विश्व वारकरी सेना करणार उपाेषण

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पांडुरंगाच्या मूर्तीच्या डाव्या पायाचा व्रज्वलेप निघाला असून मंदिर समितीकडून दुर्लक्ष हाेत आहे, असा आराेप विश्व वारकरी सेनेने केला आहे. याबाबत समितीला निवेदनही दिले. निघालेला व्रज्वलेप लावावा; अन्यथा विश्व वारकरी सेनेतर्फे बेमुदत उपाेषण करण्यात येईल, असा इशारा विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.गणेश महाराज शेटे यांनी दिला. पंढरपूर हे भक्तांचे आराध्य दैवत आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठलाच्या व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींची झीज होऊ नये यासाठी गत वर्षापूर्वी त्या मूर्तीस व्रज्वलेप केला होता. पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार व त्यांच्या सर्व देखरेखीखाली हा व्रज्वलेप केला होता. मात्र, एक वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच श्री क्षेत्र पंढरपूर येथील मंदिरातील रुक्मिणी मातेच्या पायाचा व्रज्वलेप निघाला होता. दाेन महिन्या आधी रुक्मिणी मातेच्या पायाला व्रज्वलेप लावला होता, मात्र आता पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायाची झीज होत आहे, त्यामुळे श्री पांडुरंगाच्या मूर्तीची झीज पुन्हा एकदा सुरू होण्यास सुरुवात झाली. ही झीज थांबवावी व श्री क्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या वारकरी भक्तांच्या भावनांशी होणारा खेळ थांबवावा, असे िनवेदन िवश्व वारकरी सेनेतर्फे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुदलवार यांना दिले. या वेळी विश्व वारकरी सेनेचे, संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे, तुकाराम महाराज भोसले, महादेव इंगोले, गजानन दहीकर, संतोष वाघोळकर, नामानंद जाधव, माऊली सुरडकर, हरिभाऊ लोंढे, नानासाहेब पाटील, सुरेश बडे, गीतांजली अभंग, सुरेंद्र महाराज नागपूरकर आदी उपस्थित होते.

...तर प्रशासनाला घेराव : विठ्ठल मूर्तीची झीज पंढरपूर येथील मंदिर समितीने व प्रशासनाने न थांबवल्यास येणाऱ्या काळात विठ्ठल मंदिराच्या प्रशासनाला घेराव घालण्यात येईल. उपोषणाच्या मार्गाने आम्ही आमचा न्याय मागणार आहे, असाही इशारा हभप गणेश महाराज शेटे यांनी दिला.

छायाचित्र काढण्याची परवानगी द्यावी
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील श्री पांडुरंगाच्या मूर्तीचे छायाचित्र काढण्याची परवानगी आम्हास मिळावी, अशी मागणी या वेळी हभप गणेश महाराज शेटे यांनी केली. मात्र अद्याप फोटो काढण्यास परवानगी दिली नाही. एवढा खर्च करून लावलेला जर व्रज्वलेप सहजासहजी निघत असेल तर हा भाविकांच्या भावनेशी सुरू असलेला खेळ म्हणावा लागेल. नवरात्र उत्सवात (घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशीच)विश्व वारकरी सेनेच्या वतीने वारकरी बांधवांना व भाविकांसह नामदेव पायरीजवळ उपोषण करणार असल्याचा इशारा दिला.

बातम्या आणखी आहेत...