आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाणी पुरवठा योजनांची पाणीपट्टी आणि आणि घरपट्टी अदा न केलेल्या ५९ हजार ४२९ जणांना ग्रामपंचायतींमार्फत नोटीस बजावण्यात आली. या प्रकरणांचा निपटारा व्हावा, यासाठी प्रकरणे शनिवारी हाेणाऱ्या लोकअदालतीमध्ये सादर करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात विविध प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनांच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यात येताे. यात ८४, ६४ खेडी पाणी पुरवठा याेजनांचा समावेश आहे. मात्र पाणीपट्टी वसूल हाेण्याचे प्रमाण अल्प आहे. काही ठिकाणी तर १५ दिवसांपेक्षा जास्त दिवसांनी पाणी . अशातच पाणीपट्टी वसुलीसाठी पुरेसे मनुष्यबळ नसणे आदींमुळे पाणीपट्टी अल्पप्रमाणात वसुली हाेते.
१० टक्केच वसुली : वर्षभरात प्रादेशिक पाणीकर वसुली केवळ १० टक्केच झाली. वर्षभरात १७ काेटी ६४ लाख ७२६२ रुपये अपेक्षित असताना १ काेटी ९३ लाख ८० हजार वसुली झाली.
अशी आहे स्थिती पं. स. ग्रा. पं. प्रकरण खातेदार अकोला ९७ २२००० २२००० अकोट ८५ ३४०३ ३४०३ बाळापूर ६६ १७८६ १६५० बार्शीटाकळी ८२ १५००० १५००० पातूर ५७ २५६२ २२१२ तेल्हारा ६२ १११७४ १११७४
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.