आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शविार योजनेत सहभागी व्हा; जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांचे आवाहन

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शविार योजनातंर्गत धरण, तलाव व नाल्यांमधील गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात येत आहे. या उपक्रमाचा ग्राम पंचायतींनी लाभ घेऊन शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी व धरणाच्या साठवण क्षमता वाढवण्यासाठी सर्व सरपंचानी सहभागी व्हावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी केले. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळेत बोलत होत्या. त्यांनी कार्यशाळेत विविध विषयांचा आढावा घेतला.

जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. कार्यशाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, नविासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बाळासाहेब बोटे, जि.प.लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता मंगेश काळे, वनविभागाचे सहायक मुख्य वनअधिकारी सुरेश वडोदे यांच्यासह गटविकास अधिकारी, तहसिलदार व सरपंच उपस्थित होते.

या वेळी निसर्ग कट्टा एनजीओ व राजेश्वर वदि्यालयाच्या वदि्यार्थ्यांनी प्लास्टीक वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती केली. तसेच वन विभाग व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी वदि्यापीठाच्या वदि्यार्थ्यांनी पर्यावरण जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केले तर आभारउपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे यांनी मानले.

स्मशानभूमीसाठी प्रस्ताव सादर करा
जिल्ह्यात रोहयोअंतर्गत १२८ ठिकाणी स्मशानभूमीचे बांधकाम केले आहे. आवश्यकता असलेल्या ग्राम पंचायतींनी प्रस्ताव सादर करावा. शाळा, स्मशानभूमी व शासकीय जागेवर वृक्षारोपण करुन त्याचे संगोनण करावे. याकरीता रोहयोअंतर्गत आवश्यक ती सर्व मदत करु. ग्रामपंचायतस्तरावर येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन पूर्ण सहकार्य करेल. सर्व ग्रामपंचायतांनी गाव विकासा करीता पुढाकार घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन
प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शासनाचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमात काही ग्रामपंचायत उत्स्फूर्तेने सहभाग घेत असून उर्वरित ग्रामपंचायतीनेही पुढाकार घेऊन शासनाच्या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी केले.

कार्यशाळेत यावर झाली चर्चा
कार्यशाळेत मग्रारोहयोअंतर्गत प्रत्येक गावात स्मशानभूमी बांधकाम, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण मुक्त करुन सार्वजनिक ठिकाणी वृक्षलागवड, प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर घनकचरा व्यवस्थापन, प्रत्येक शाळेत रोहयोमार्फत स्कूल मल्टी युनिट टायलेट बांधणी व नाला खोलीकरण इत्यादी कामाचे माहिती देण्यात आली.

कार्यशाळेत सरपंचानी आपले मनोगत व्यक्त केले. वृक्ष दत्तक उपक्रमाअंतर्गत वृक्ष रोपांचे संगोपन व संवर्धनाचे उत्कृष्ट कार्य केलेल्या पर्यावरण प्रेमीना जिल्हाधिकारी यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आले.

जिल्ह्यात अपूर्ण राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावेत. शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचा सर्व ग्रामपंचायतीने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...