आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘संसद आणि भारतीय राजघटना लोकशाहीचे दोन मौलिक घटक आहे. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय सांसदीक प्रणालीबाबत जाण विकसित व्हावी, राष्ट्रासमोरील विविध प्रश्नांबाबत आकलन व्हावे आणि त्यांच्यातील वादविवाद कौशल्याचा विकास व्हावा, या हेतूने प्रभात किड्स स्कूलमध्ये अभिनव असा युवा संसद उपक्रम शनिवारी १८ जूनला झाला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्थानिक, राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर भाष्य करुन प्रेक्षकांना भारतीय ससंदेची उत्कट अनुभूती करुन दिली.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन बुरघाटे उपस्थित होते. प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका वंदना नारे, सचिव नीरज आंवडेकर या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, व्यवस्थापक अभिजीत जोशी, समन्वय मो. असिफ उपस्थित होते. प्रभातच्या ५१ विद्यार्थ्यांनी अभिरुप संसद उपक्रमात भाग घेतला. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. अभिरुप संसदेत प्रभातच्या युवा संसद सदस्यांनी अध्यक्ष महोदयाच्या आगमनापासून नवीन सदस्यांचा शपथविधी, दिवंगत सभासदाला श्रद्धांजली, प्रश्नकाळ, सदस्यांनी उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्यासह विधेयकावर चर्चा आदी संसदेच्या संपूर्ण दिनक्रमाचे सुंदर सादरीकरण केले.
युवा संसदेची संकल्पना प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे यांची असून, सांस्कृतिक विभागप्रमुख नंदकिशोर डंबाळे यांच्या समन्वयात मुकुंद माळवे यांनी संहितेचे लेखन तथा संकलन केले. मृणाल माळवे यांनी विद्यार्थ्यांचा सराव घेतला आणि कार्यक्रमाचे सुंदर संचालन केले. नंदकिशोर डंबाळे यांनी संचालन केले. या कार्यक्रमासाठी दिनेश पाटील, सुरज भांगे, सचिन मुरुमकार, प्रशिक गोंडाणे, प्रशांत तळोकार, आशिष बेलोकार, प्रमोद गोलडे, किशोर काळे, मंगेश सिंगनाथ, प्रतिक वाघ यांच्यासह प्रभातच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.