आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रारंभ:जैन धर्मीयांच्या पर्यूषण पर्वास आजपासून प्रारंभ

लोणार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैन धर्मात पर्यूषण पर्व मोठ्या उत्साहाने साजरे केले जात असून त्याची सुरूवात आजपासून होणार आहे. हे पर्व आठ दिवस ३१ ऑगस्टपर्यंत साजरे केले जाणार आहे.

आत्म्याची शुद्धी करून करून योग्य उपक्रमावर लक्ष केंद्रित करणे हा उद्देश हा पर्व साजरा करण्यामागे आहे. पर्यावरणात प्रती आत्मा तटस्थ केल्याशिवाय शुद्धी होत नाही. यासाठी कल्पसूत्र या तत्त्वार्थ सूत्राचे वाचन आणि विवेचन यामध्ये केले जाते. संत मुनी आणि विद्वानांच्या सानिध्यात स्वाध्याय केला जातो. पूजा अर्चा, आरती, त्याग, तपस्या आणि उपवास करून अधिकाधिक वेळ संतांच्या सानिध्यात घालवला जातो.

शिवाय आपल्या दैनंदिन कामकाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न यादरम्यान केला जातो. संयम आणि विवेकाचा अभ्यास या पर्वात केला जात असून मंदिर परिसरात अधिक वेळ घालवला जातो. हजारो जैन बांधव काहीही न खाता निरंकार उपवास करतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी संवत्सरी पर्व साजरे केले जाते. त्या दिवशी लोक उपवास करून कुकर्मापासून दूर राहण्याचा संकल्प करतात. त्याचबरोबर सर्व सजीवांची क्षमा मागता क्षमा भाव हा याचा मूलमंत्र असून जैन परंपरेतला मिच्छामी दुक्कडम हा उत्तम संस्कार मानला जातो.

लोणार शहरातील स्थानिक धीरज भवन मध्ये उपस्थित प. पू. अनुप्रेक्षाजी म.सा. आदि ठाणा ३ च्या सानिध्यात पर्युषण पर्व साजरे केले जाणार असून यामध्ये प्रार्थना, प्रवचन, प्रतिक्रमण तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. तसेच शहरातील जैन मंदिराला भव्य दिव्य स्वरूपात सजवले गेलेले असून चेन्नई येथील दिनेशभाई, सम्यकभाई, तरुणभाई यांच्या नेतृत्वाखाली जैन मंदिरात पर्युषण पर्व साजरे केले जाणार आहे.

नकळत चुका झाल्यास केली जाते क्षमायाचना
मिच्छामी दुक्कडम म्हणजे हातून कळत नकळत काही चुका घडल्या असतील, कोणाचे मन दुखावले गेले असेल तर आपण आपले कुटुंबीय, नातेवाइक, मित्र यांची क्षमायाचना मागितली पाहिजे. अशी प्रथा जैन धर्मात आहे. मिच्छामी दुक्कडम असे त्याला संबोधले जाते. कल्पसूत्र या तत्त्वार्थ सूत्राचे वाचन व विवेचन केले जाते. संत मुनी आणि विद्वानांच्या सानिध्यात स्वाध्याय केला जातो. पूजा अर्चा, आरती, उपवास केला जातो.

बातम्या आणखी आहेत...