आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तीर्ण:गांधर्व महाविद्यालय मंडळाची प्रारंभिक परीक्षा पावणेचार वर्षांची वैदिशा उत्तीर्ण

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईतर्फे घेण्यात आलेली प्रारंभिक परीक्षा अकोल्यातील अवघ्या पावणेचार वर्षाची वैदिशा वैभव शेरेकर या चिमुकलीने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे वैदिशाने यापूर्वीही वयाच्या अडीच वर्षात सर्व देशांच्या राजधान्या व त्यांचे राष्ट्रध्वज अचूक ओळखण्याचा विक्रम केलेला आहे. तिच्या नावाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड या नामांकित संस्थांनी घेतली आहे.

चिमुकल्या वयात आपल्या असाधारण बुद्धिमत्तेचा परिचय देणारी वैदिशा गायनाच्या क्षेत्राकडे वळली आहे. तिचा आवाज, आवड, मेहनत आणि यश पाहून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची परीक्षा देण्यासंदर्भात पालकांनी निर्णय घेतला. अखेर तिच्या यापूर्वीच्या कामगिरीबद्दल ऐकून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई येथील तज्ज्ञांनी तिला परीक्षा देण्यास सहमती दर्शवली. सत्राच्या शेवटी मुंबई येथील चमूने परीक्षा घेतली. वैदिशाने प्रत्येक प्रश्नांची अचूक उत्तर देत सर्वांना अचंबित करून टाकले व प्रथम श्रेणीत परीक्षा उत्तीर्ण केली. वैदिशाचे वडील वैभव ज्ञानेश्वर शेरेकर हे अकोल्यातील एका बँकेत प्रबंधक आहेत. तर आई दीपाली शेरेकर या गृहिणी आहे.

परीक्षेसाठीचा अर्ज मंडळाने केला होता रिजेक्ट
या परीक्षेसाठी तिचा ऑनलाइन अर्ज भरला. मात्र, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांनी वैदिशाच्या वडिलांशी संपर्क करून तिचे वय खूप कमी असल्यामुळे दोन ते तीन वर्षानंतर तिला परीक्षेला बसवा असे सुचवले. अर्ज रिजेक्ट करण्याबाबतही सूचना दिल्या. मात्र पालकांनी वैदिशाच्या यापूर्वीच्या विक्रमांची माहिती मंडळाला देत परीक्षेची संधी द्यावी, अशी विनवणी केली.

बातम्या आणखी आहेत...