रेल्वेचा मोठा निर्णय!:रुग्ण, विद्यार्थी, दिव्याग्यांना सवलतीच्या दरात करता येणार रेल्वे प्रवास; प्रशासनाची माहिती
कोरोनापूर्वी रेल्वेकडून 53 श्रेणींमध्ये तिकिटांवर सूट दिली जात होती. मात्र, सध्या दिव्यांग, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना एकूण 16 श्रेणीमध्ये प्रवास सवलत देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाच्या वतिने घेण्यात आला आहे.
रेल्वे मंत्रालयाने विविध कोट्यांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती बंद करण्याचा निर्णय घेतल्याने पूर्वीच्या लाभार्थी प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. पण मंत्रालयाने महसुलातील घट लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भविष्यात रेल्वेचा महसूल वाढला तर परत यापैकी काही सुविधा रेल्वे मंत्रालय विचारपूर्वक सुरू करेल, अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करीत आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि विधवा महिलांसाठीच्या सवलती त्वरित सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
आता यानांच मिळणार सवलत
- दिव्यांग, दृष्टिहीन, मानसिकदृष्ट्या दिव्यांग, मूकबधिर व्यक्ती आणि त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशाला ट्रेनच्या तिकिटांवर आणि मासिक व त्रैमासिक पासवर 50 टक्के सूट मिळणार.
- कॅन्सरग्रस्त रुग्ण, थॅलेसेमिया रुग्ण, हार्ट आणि किडनीच्या समस्या असलेले रुग्ण, हिमोफिलियाचा रुग्ण, टीबी, एड्स आणि ऑस्टोमी रुग्ण, अॅप्लास्टिक अॅनिमिया आणि सिकलसेल अॅनिमिया रूग्ण. रूग्णांसोबत एका व्यक्तीलाही आजारानुसार विविध प्रकारांमध्ये सवलत देण्यात येणार.
यांच्या सवलती अद्यापही बंदच
- ज्येष्ठ नागरिक.
- राष्ट्रपती पोलिस पदक आणि भारतीय पोलिस पुरस्कार विजेते, राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेता,
- युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या विधवा
- घरी किंवा शैक्षणिक दौऱ्यावर जाणारे विद्यार्थी, ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना वर्षातून एकदा शैक्षणिक दौरा, यूपीएससी किंवा एसएससी परीक्षेला बसणारे विद्यार्थी, भारत सरकारच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या परदेशी विद्यार्थी
- कृषी प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी जाणारे शेतकरी, शेती किंवा दुग्ध व्यवसायाशी संबंधित संस्थांना भेट देणारे शेतकरी,
- कलाकार आणि खेळाडू : परफॉर्मन्ससाठी जाणारे कलाकार आणि चित्रपटाशी संबंधित तंत्रज्ञ, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेणारे खेळाडू
- केंद्र किंवा राज्य सरकारची मान्यता असलेल्या पत्रकारांना प्रसारमाध्यमांशी संबंधित कामासाठी प्रवास करताना रेल्वे भाड्यात 50 टक्के सूट दिली जात असे. याशिवाय पत्रकारांना वर्षातून दोनदा पत्नी आणि मुलांसह प्रवास करतानाही सवलत मिळत होती.
- अॅलोपॅथिक डॉक्टर, नर्स