आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्या

मूर्तिजापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर अतिशय वाईट वेळ आलेली असून, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या मार्गदर्शनात मूर्तिजापूर येथे मूर्तिजापूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते यांना निवेदन देण्यात आले.

अतिवृष्टीमुळे परिसरात शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने देण्यात येऊन ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली. या वेळी रवी राठी, राजू मोहोड, रामकृष्ण गावंडे, जगदीश मारोटकर, राम कोरडे, विष्णू लोडम, निजाम भाई, इब्राहिम घानिवाले, निसर, श्रीकृष्ण बोळे, किशोर सोनोने, लाला डाबेराव, शुभम मोहोड, अमोल लोकरे, गौरव ढोरे, निखिल ठाकरे, विशाल शिरभाते, रवी मार्कंड, आनंद पवार, मुकेश अटल, अक्षय माळोदे, संतोष चराटे, गजानन दाभाडे, गजानन सवईकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व युवक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...