आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य शिक्षक समिती निवृत्तीवेतन, सातव्या वेतन आयोगाचे हफ्ते थकल्याने आक्रमक झाली असून, बुधवारी काळ्या फित लावून निषेध नाेंदविण्यात आला. वेतनाबाबत जि. प. शिक्षक व शाळांबाबत शासन - प्रशासनाचे धाेरण कसे आहे, हे अनेकदा समाेर आले आहे.
वेतन वेळेवर मिळावे, यासाठी शिक्षक संघटनांकडून अनेकदा पाठपुरावा करण्यात येताे. शिक्षक दिनाच्या महिन्यातही त्यांना वेतनासाठी संघर्ष करावा लागताे. यंदा तर राज्य शासनाने ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी करण्याचा निर्णय घेतला हाेता. मात्र जि. प. खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांचे वेतन दिवाळीपूर्वी अदा झाले नव्हते. दरम्यान आता वेतनातील थकबाकीच्या अनुषंगाने शिक्षक रस्त्यावर उतरले.
निषेध करणाऱ्यांमध्ये शिक्षक समितीचे िजल्हाध्यक्ष राजेश देशमुख, विजय टोहरे, गोपाल सुरे, मारोती वरोकार, प्रशांत अकोत , अनील पिंपळे ,किशोर कोल्हे,अनंत हिरोळकर, राजेंद्र फोकमारे ,सुधीर डांगे, राजेश वानखडे , विशाल घोगले, दरबार सिंग राठोड, सईदखान समशेर खान, पांडुरंग डाबेराव, सचीन ठोंबरे, योगीता ठोंबरे, कैलास देशमुख, सुभाष ढोकणे, केशव देशमुख , राजाराम म्हैसने, रंगभारत अमझरे , किशोर दाते, सुरेश खोटरे अविनाश मोहिते, अविनाश भारसाकळे, रविंद्र देशमुख, कल्पना येवले, दामधर, रवींद्र गिन्हे, प्रफुल वानखडे, महेश पटके, राजेश नाकट , नितीन भागवत , मोहन ढाकरे , आतिष तराळे , नीलेश कुकडे , प्रशांत सरोदे ,, संतोष कुरवाडे , गजानन मिसाळकर, राजेश डाखोरे, गजानन खोबरखेडे , सुनिल गाडेकर , स्वप्नील दुतोंडे , मनोज लेखनार ,कल्पना येवले , निलीमा कथले , भावना यावले, मंगला रडके , जया भागवत , , शैलेंद्र देशमुख, नागेश सोळंके, साजीद राणा,नरेंद्र कुळकर्णी, सुधीर बचे, किशोर पुंडे, किशोर श्रीनाथ . मुरलीधर रेवास्कर , विकास वाडकर, दिनेश भटकर, सुनील बाहे, रमेश खराटे,राहुल लांडे, अभय मसने, ताज मोहम्मद, एकनाथ कंकाळ, प्रवीण हुसे, प्रविण डाबेराव , श्रीकांत राऊत, सतीष वरोकार, विवेक रिंगणे,गुणवंत लोखंडे, रघुनाथ लाखे, ज्ञानदेव गावंडे, बद्रीनाथ मानकर, जयमाला सोनकुसरे मॅडम, स्वीटी मोर, विजुमाला थेटे,सुरेश पोते आदींचा समावेश हाेता.
आर्थिक तरतूद का नाही
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वेतन सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्तीवेतन आणि सातव्या वेतन आयोगाचे हप्ते राज्य शासनाने दिलेले नाहीत. आर्थिक तरतूद नसल्याने हप्ते थकले आहेत, त्यामुळे ही वेळीच आर्थिक तरतूद का नाही, असा सवाल शिक्षकांकडून विचारण्यात येत आहे. यासंपूर्ण याच्या निषेधार्थ शिक्षकांनी 9 नोव्हेंबर रोजी काळी फित लावून शालेय कामकाज केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.