आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभार्थ्यांनी मोर्चा काढत न.पं.ला दिले निवेदन‎:घरकुलाचा पाचवा हप्ता‎ द्या, अन्यथा आंदोलन करू‎

मारेगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील आर्थिक दुर्बल योजने‎ अंतर्गत मिळालेल्या घरकुलांचा एक‎ वर्षापासून पाचवा हप्ता थकल्याने‎ उसनवारीवर घरकुलाचे काम पूर्ण‎ करणारे लाभार्थी आर्थिक अडचणीत‎ सापडले आहेत. पाचवा हप्ता द्या‎ अन्यथा आंदोलन करू असा इशारा या‎ लाभार्थींनी मोर्चा काढत‎ नगरपंचायतीला निवेदनातून दिला‎ आहे.‎ आर्थिक दुर्बल घटकातील शहरातील‎ नागरिकांना पंतप्रधान आवास योजने‎ अंतर्गत घरकुल मंजूर झाले.‎ लाभार्थींनी जुनी घरे पाडून नवीन‎ घरकुल बांधले . चार हप्तेही मिळाले.‎ मात्र शेवटचा आणि पाचवा हप्ता एक‎ वर्षापासून थकला आहे.

तरी‎ कर्जबाजारी होत लाभार्थींनी घरकुल‎ बांधकाम पूर्ण केले. पाचवा हप्ता‎ मिळण्यासाठी लागणारी सर्व प्रक्रिया‎ पूर्ण केली. परंतु म्हाडाकडे नगरपंचायत‎ प्रशासनाने पाठपुरावा न केल्याने‎ शहरातील घरकुलाचे ४० लाभार्थी‎ पाचवा हप्ता मिळण्यापासून वंचित‎ राहिले आहे. त्रस्त लाभार्थींनी दि. १०‎ एप्रिलला मूकमोर्चा काढत नगराध्यक्ष‎ डॉ. मनीष मस्की, मुख्याधिकारी‎ अभिजित वायकोष यांना निवेदन दिले.‎ निवेदनावर ४० लाभार्थींच्या सह्या‎ आहेत.मोर्चाचे नेतृत्व नगरसेवक वैभव‎ पवार यांनी केले.आ. संजीव रेड्डी‎ बोदकुरवर यांचे माध्यमातून म्हाडा‎ मध्ये आपण पाठपुरावा करू अशी‎ माहिती पवार यांनी दिली.‎