आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभा संपन्न:दानापूर येथे शांतता समितीची सभा संपन्न

दानापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दानापूर ग्रामपंचायत भवन येथे २० ऑगस्टला आगामी बैलपोळा व गणेश उत्सव लक्षात घेता हिवरखेडचे ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सभा घेण्यात आली. या वेळी चव्हाण यांनी बैलपोळा व गणेश उत्सवाचे सर्व नियम व अटी सांगितल्या. सर्व नियमांचे पालन करण्याचे तसेच सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले. यावेळी अॅड. अजितसिंह शेंगर, श्यामकुमार ढाकरे यांनी मार्गदर्शन केले.

या सभेकरिता पोलिस पाटील संतोष माकोडे, तंटामुक्ती अध्यक्ष तेजराव वाकोडे, उपसरपंच सागर ढगे, बंडू ढाकरे, माजी उपसरपंच वाकोडे, माजी उपसरपंच शे. खालिक शे. उस्मान, गोपाल विरघट, नंदकिशोर नागपुरे, ग्रा. पं. सदस्य गणेश सांगुनवेडे, ग्रा. पं. सदस्य गोपाल विखे, नरहरी हागे, शे. चांद, कपिल घायल, सूर्यकांत वैलकार, धम्मपाल वाकोडे, प्रकाश ढगे तसेच गावातील सर्व गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक राहणे यांनी केले, तर आभार अॅड. अजितसिंह सेंगर यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...